बीड (प्रतिनीधी) अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करून, तिची छेडछाड व विनयभंग केल्यामुळे कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या धक्कादायक प्रकरणातील आरोपी मनेश उर्फ बाळू गंगाधर जायगुडे (रा. दिमाखवाडी, ता. गेवराई) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ व्यंकटेश एच. पाटवदकर यांनी दोषी ठरवत ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायालयात चाललेल्या या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. सहायक सरकारी वकील अजय श्रीमंतराव तांदळे यांनी केलेला युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला कलम ३०५, ३५४, ३५४-ड (भादंवि) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दोषी ठरवले. त्याला ६ महिने साधा कारावास आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास अतिरिक्त १ महिना साधा कारावास भोगावा लागणार आहे. या प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी गव्हाणे आणि सविता चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य केले.
No comments:
Post a Comment