परळी (प्रतिनिधी) - रामनगर लिबोनी येथील बौद्ध विहारात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त उत्सव समितीची बैठक रविवारी (दि. 15 मार्च) उत्साहात पार पडली. या बैठकीस रामनगर येथील जेष्ठ नागरिक आयु. सुभाष कांबळे, माणिक वाघमारे, मारुती बदने, वैजनाथ वाघमारे, ज्ञानेश्वर ढगे, अरुण ठेंगे, दिलीप जगताप, मच्छिंद्र ठेंगे, रवि ढगे आदींचे मार्गदर्शन लाभले.
बैठकीत जयंती उत्सव समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. *अध्यक्षपदी कुंडलीक (बाबा) कांबळे, उपाध्यक्षपदी विशाल चव्हाण तर सचिवपदी गोविंद सरवदे यांची निवड करण्यात आली.*
तसेच मार्गदर्शक मंडळात गुनाजी कांबळे, भास्कर सरवदे, राजभाऊ बावणे, शरद वाघमारे, चंद्रकांत वाघमारे, लालासाहेब वाघमारे, लक्ष्मण कांबळे, कृष्णा बावणे, गौतम जगताप, अंकुश नाईकवाडे, मनोज कांबळे, नवनाथ आचार्य, गोविंद आचार्य, निरंजन लटपटे, वैजनाथ वाघमारे, सुभाष लहाने यांचा समावेश करण्यात आला.
याशिवाय रोहित वाघमारे, संतोष ठेंगे, राहुल वाघमारे, आदित्य ढगे, आकाश चव्हाण, अनिकेत ढगे, साहिल चव्हाण, अभिषेक ढगे, बालाजी सरवदे, अशोक ढगे, कन्हैया ढगे, सचिन ठेंगे, रमेश फड, राहुल जंगले, आकाश कांबळे, विकास कांबळे, भागवत जगताप, पाराजी कांबळे, सोहम चव्हाण आदींचीही विविध पदांवर निवड करण्यात आली.
दरम्यान, यंदाची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला असून या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
No comments:
Post a Comment