Wednesday, March 18, 2026

भारतीय नववर्ष हा आपल्या भव्य संस्कृती आणि सभ्यतेचा सुवर्ण दिवस.- दिव्य गुरु श्री आशुतोष महाराजजी.

तुम्हाला माहित आहे का? विक्रम संवत २०८३ च्या चैत्र शुक्ल प्रतिपदा महणजेच १९ मार्च 2026 रोजी, आपल्या भारतीय नववर्षाची सुरुवात आहे ? हा दिवस एका अर्थाने आपल्या भव्य संस्कृती आणि सभ्यतेचा वर्धापन दिन आहे. भारतीय संस्कृती नुसार  अध्यात्म आणि विज्ञान अंतर्भूत आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यातून भारतीय संस्कृतीची ओळख करून घेण्याची आणि शिकण्याची संधी आहे.

भारतीय कैलेंडरनुसार, विश्वाची सुरुवात ज्या दिवशी झाली जो दिवस वर्षांचा पहिला दिवस महणून स्वीकारला गेला.  महाराजा विक्रमादित्य यांनी २०८३ वर्षांपूर्वी एक कैलेंडर सादर केले, जेणेकरून आपण आपल्या भारतीय तारखा, महिने आणि वर्षाशी परिचित राहू. या विक्रमी संवतानुसार, चैत्र शुक्ल प्रतिपदा हा भारतीय कॅलेंडरचा पहिला दिवस मानला जातो.

दुसरीकडे,  पाश्चात्य देशांच्या  अंधानूकरणामुळे आपन ज्या ग्रेगोरियन कैलेंडरचे अनुसरण करू लागलो आहोत, ते काही दिवसांपूर्वीच तयार झाले. ते अंदाज आणि अनुमानांवर आधारित होते. हे कैलेंडर येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी तयार करण्यात आले. त्यावेळी असा अंदाज आहे की जेव्हा येशू ख्रिस्तांचा जन्म झाला तेव्हा हिवाळा ऋतू सुरू होता म्हणून, शतकातील तोच दिवस ज्याला आपण १ जानेवारी माणतो ती तारीख म्हणून स्वीकारण्यात आली. 
उलट, भारतीय परंपरेनुसार, चैत्र शुक्ल प्रतिपदेला आपोआपच ताजेपणाची छटा दिसून येते. केवळ एक नाही तर अनेक युक्तीने या दिवसाला वर्षांचा पहिला दिवस म्हणून घोषित करतात. चैत्र शुक्त हा सर्वांत प्रिय, सर्वोत्तम ऋतू मानला जातो.
नैसर्गिक रित्या उज्ज्वल दिवस मोठे होतात आणि काळया रात्री लहान होतात. यासह, उत्साह, आनंद आणि प्रेरणा यांच्यासह निसर्गाची प्रत्येक कृती स्वतःला पसरवते. ही जाणीव, ही जागृती, ही हालवाल है निसर्गाचे साक्षीदार आहेत.
 काहीही असो, चैत्र नक्षत्र , काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत उत्सवाचे ढोल वाजवले जातात. उदाहरणार्थ, जम्मू काश्मीरमध्ये 'नौरोज' किंवा नवरेह' पंजाबमध्ये वैशाखी महाराष्ट्रात 'गुढीपाडवा', आंध्रप्रदेशात 'युगादि', सिंधमध्ये ' चेतीचंड', केरळमध्ये 'विशु, आसाममध्ये 'रॉंगली बिहू', बंगालमध्ये 'पोईला वैशाख, तामिळनाडूमध्ये ' पुठांडू' है सर्व सण भारताच्या सामाजिक जाणिवेचे प्रतिबिंब आहेत. एक प्रकारे, ते काही गोष्टींचे सूचक आहेत. या दिवशी, नवरात्राला देखील सुरूवात होते आणि संपूर्ण भारतात जगदंबेचा जयघोष होतो. म्हणूनच, चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी, भारताचे सामाजिक जीवन सुरू होते व चेतना मनात प्रवेश करते.
      चैत्र शुक्ल प्रतिपदा हा एक शुभ मुहूर्त मानला जातो कारण या दिवशी नक्षत्रांची दशा, स्थिती आणि प्रभाव चांगला असतो. गरेश्यामाला पद्धतीनुसार, नक्षत्र जगातून पृथ्वीवर चार प्रकारच्या लहरी पाडतात (यम, सूर्य, प्रजापती आणि संयु, )चैत्र शुक्ल प्रतिपदा दिवशी प्रजापती आणि सूर्य नावाच्या लहरींचा एक विशेष वर्षाव होतो. या सुक्ष्म लहरी आध्यात्मिक शक्तीचे स्रोत आहेत. ते खूप समृद्ध आणि उत्साहवर्धक आहे. म्हणून, तर आपण या शुभ काळात चांगले संकल्प घेऊन नवीन वर्षात पाऊल ठेवले तर आपण काय म्हणू शकतो!

चला तर मग आपण आपल्या भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक वैभव समजून घेऊया आणि त्यांच्याशी जोडले जाऊया. आपल्या विक्रमी संवत चे अनुषंगाने, आपण कल्पनाशक्ती किंवा अनुमानांवर आधारित नसून अध्यात्म आणि विज्ञानावर आधारित शोध लावले पाहिजेत.  चैत्र शुक्ल प्रतिपदाला आलिंगन द्या, ज्याच्या मागे आपल्या महान ऋर्षीचा प्रकाश आहे. सर्वांना दिव्य ज्योती जागृत संस्थान कडून भारतीय नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

No comments:

Post a Comment