बीड (प्रतिनिधी) स्त्री-शक्ति प्रतिष्ठाण बीड आणि पसायदान सेवा प्रकल्प ढेकणमोह यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक महिला दिनाचे औचित्य साधुन समाजातील सर्व स्तरातील सर्व घटकातील संघर्षशील कार्य कर्तृत्ववान महिलांना अनाथाची माय डाॅ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या सेवारत्न पुस्कार सोहळा शिवसंग्रामच्या नेत्या डाॅ. ज्योतीताई विनायकरावजी मेटे यांच्या अध्यक्षेत खाली जिजाऊ ब्रिगेडीयरच्या जिल्हाध्यक्षा प्रा. संगीताताई शिंदे (पवळ), ढेकणमोहच्या सरपंच सौ. मंजुताई गाडीवान, जिजाऊ महिला सेवा सहकारी संस्था वाशी संस्थापक अध्यक्षा सौ. शोभाताई दत्तात्र्यजी घुमरे, रेणुका गृहद्योकच्या संचालिका शितलताई धोहंडरे, बीड. न. प.च्या माजी सभापती भारतीताई क्षीरसागर, मुख्याध्यापिका किर्तीताई साळुंखे (पांगारकर), बाला घाट इंग्लीश स्कुलच्या प्रियंका तोष्णीवाल , जीवन विद्या मिशनच्या सुवर्णाताई चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला.
या वर्षी डाॅ. पल्लवी चंद्रकांत तोंडे, बैनडिक्ता फ्रांसिस वाझ, उषा जगन्नाथराव शेकडे, सविता विजयसिंह गोलेकर, बेबी सुनिल खंडागळे, राणी चंद्रकांत माने, अश्विनी ऋषीकेश घुले (सेप), सुषमा विवेक सोमवंशी, गीतांजली रंगराव लव्हाळे, ज्योती विजयकुमार गिरे, फरहिन बेगम शौकत बागवान, वैशाली चत्रभुज वाघमारे, दराडे विमल मुकुंदराव यांना मान्यवरांच्या हस्ते शाल हार स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देऊन डाॅ. सिधुताई सपकाळ सेवारत्न पुरस्कार देऊन मान्यवरंच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
कार्यक्रमची सुरूवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन आणि दिप प्रज्वलन आणि मान्यवरांच्या सत्कार समारंभाने झाली.
स्त्री-शक्ति प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा सौ. जयश्री विलास विधाते सह पसायदान सेवा प्रकल्पाचे संचालक गोवर्धन दराडे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्तावीकात आजवरच्या कार्याचा आढावा घेतला. आपल्या अध्यक्षीय भाषणात डाॅ. ज्योतीताई मेटे यांनी प्रशासन राजकारण समाजकारण आणि कुटुंबात स्त्रीच स्थान यावर प्रकाश टाकला तर प्रा. संगीताताई शिंदे यांनी आपल्या मनोगतात समाजातील संघर्षशील महिलांना सिंधुताईंच्या नावाने पुरस्कार प्राप्त होणे म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचा केलेला योग्य सन्मान आहे असे मत व्यक्त केले. या दिमाखदार सोहळ्यांचे सुत्रसंचलन उदयमुख सुत्रसंचालीका पल्लवी घुमरे आणि अश्वीनी कानडे यानी केले तर या कार्यक्रमाची सांगता सुरुची भोजनाने झाली.
No comments:
Post a Comment