या सर्व घटनेवर मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रणिती शिंदेंवर हल्ला करणाऱ्याचं समर्थन करणार नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय.
तसेच फक्त मराठा आहे म्हणून जबाबदार धरणं चुकीचं आहे. याच्या पाठीमागे दुसरंही काही कारण असू शकतं. या संदर्भात मी अनभिज्ञ आहे, मात्र या हल्ल्याचा समर्थन नाही असं मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलंय.
त्याचबरोबर बीड जिल्ह्यात माझ्या विरोधात दहा-पंधरा गुन्हे दाखल करायचे आणि मला तडीपार करायचं, असा डाव आखला आहे, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं.
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, परळी सारख्या ठिकाणी एक लाखाची सभा होत असेल तर यातून सर्वांनी बोध घ्यायला हवा. केवळ मराठा द्वेष करून भागणार नाही. मला वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवून तडीपार करण्याचा त्यांचा डाव आहे. परंतु हा डाव मराठा समाज बांधव यशस्वी होऊ देणार नाहीत, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment