Friday, March 15, 2024

इंग्रजी भाषेच्या मागे न लागता मातृभाषेवर भर द्यावा :- प्रा.डॉ‌ गजानन सवने.

बनसारोळा (प्रतिनिधी) येथील जनविकास महाविद्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व हिंदी विभाग जनविकास महाविद्यालय बनसारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने "नवीन शैक्षणिक धोरण व भारतीय भाषा" या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुरचे प्रा. डॉ. गजानन सवने बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज येथील हिंदी विभागाचे प्रोफेसर डॉ. प्रकाश खुळे हे उपस्थित होते त्यांनी आपले विचार व्यक्त करताना नवीन शैक्षणिक धोरणामुळे मातृभाषातून शिक्षणावर पुन्हा एकदा भर देण्यात आला आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा मात्र भाषेतूनच होत असतो त्यामुळे पालकांनी आपल्या विद्यार्थी घडवित असताना मातृभाषेतूनच शिक्षण देण्याची शक्ती करावी असे आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे बीज भाषक म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आंबेजोगाई येथील हिंदी विभागाचे प्रा.डॉ. अरविंद घोडके हे उपस्थित होते त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण 2024 पासून  प्रथम वर्षापासून विद्यापीठांमध्ये व महाविद्यालयांमध्ये लागू करण्यात येत आहे त्याची जाणीव च्या सूत्रातून विद्यार्थ्यांना करून दिली तसेच यापुढे कोणत्याही शाखेच्या विद्यार्थी कोणताही विषय  घेऊ शकतो असे आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे हे उपस्थित होते त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण हे एक आव्हान म्हणून सर्वांनी स्वीकारावे तसेच विद्यार्थी पालक प्राध्यापक यांनी नवीन शैक्षणिक धोरण समजून घेण्याची आवश्यकता आहे असे आपले विचार व्यक्त केले‌ . या कार्यक्रमाचे प्रस्ताविक  चर्चासत्राचे  संयोजक  हिंदी विभागप्रमुख प्रो.डॉ. मुरलीधर लहाडे यांनी केले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो. डॉ. गोपाळ भोसले यांनी केले तर आभार मीनाक्षी उबाळे यांनी मानले. प्रथम सत्राचे विषय प्रवर्तक म्हणून वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर येथील हिंदी विभागाचे प्रा. डॉ. गजानन सवने हे उपस्थित होते त्यांनी आपले विचार व्यक्त करताना पालकांनी केवळ इंग्रजी भाषेच्या पाठीमागे न लागता आपल्या  विद्यार्थीना मातृभाषेतून शिक्षण दिल्याने खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा विकास होत असतो जे ज्ञान मातृभाषातून विद्यार्थ्यांना लवकर समजते ते अन्य कोणत्याही भाषेतून समजण्यास वेळ लागतो असे विचार व्यक्त केले‌. तसेच दुसऱ्या सत्राचे वीज भाषेत म्हणून कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धारूर येथील प्रा. विनायक कापावार हे उपस्थित होते त्यांनी आपले विचार व्यक्त करताना त्रिभाषा सूत्र कशा पद्धतीने महत्त्वपूर्ण आहे याविषयी आपले विचार व्यक्त केले. ह्या चर्चासत्रासाठी  प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment