घोसपुरी येथील मयत मुलगी अल्पवयीन आहे.तिचे आणि मामाच्या मुलाचे प्रेम संबंध होते.मात्र मामाचा मुलगा असलेल्या भगवान वैजनाथ गायकवाड (वय-19 रा.घोसापुरी) हा व्यसनाधीन होता.त्यामुळे भगवानसोबत लग्न नको म्हणून नातेवाईकांचा प्रचंड विरोध होता.यातूनच भगवानने टोकाचे पाऊल उचलत आत्याच्या मुलीची हत्या केली.यात शहाजी नायबा माळी यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार भगवानसह त्याचे वडील वैजनाथ माणिक गायकवाड,बाळू माणिक गायकवाड,रमेश गव्हाणे,अंकुश उर्फ भैय्या विश्वनाथ माळी यांच्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी या घटनेतील आरोपी असलेल्या वैजनाथ माणिक गायकवाड आणि त्याचा नातेवाईक अंकुश उर्फ भैय्या विश्वनाथ माळी या दोघांना सध्या जेरबंद केले आहे.तर तीन आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेणे सुरु आहे.याप्रकरणाचा पुढील तपास पीएसआय श्री.कुकलारे हे करीत आहेत.
Monday, March 25, 2024
प्रेम प्रकरणातून लग्नास विरोध अल्पवयीन मुलीची हत्या.

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment