धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामानिमित्त वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. शिल्पा डोमकूंडवार आणि प्रशासकीय अधिकारी उदयकुमार पाद्य हे २२ मार्च रोजी बाहेरगावी होते. याची माहिती मिळताच काही डॉक्टरांसह कर्मचारी दिवसभर गायब झाले होते. यामुळे कार्यालयीन कामकाजासह रुग्णांची गैरसोय झाली होती. या कारणाने डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.
तर प्रशासकीय कारवाई
मनमानी रोखण्यासाठी वैद्यकीय अधिष्ठाता व प्रशासकीय अधिकारी मुंबई येथून आल्यावर महाविद्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. यामुळे डॉक्टरांसह काही कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सदर कारणे दाखवा नोटीस संदर्भात तसेच खुलासा समाधानकारक नसेल तर त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याचे नोटीस मध्ये म्हटले आहे.
No comments:
Post a Comment