नेहमीप्रमाणे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपकडून धक्कातंत्र वापरल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या अनेक विद्यमान खासदारांना धक्का बसणार आहे. पुढील दोन-तीन दिवसांत दिल्लीतून भाजप उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. मात्र, या यादीत अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असून, तब्बल डझनभर विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार आहे. भाजपकडून पक्षाअंतर्गत करण्यात आलेल्या सर्व्हेत राज्यातील डझनभर विद्यमान खासदार पुन्हा निवडून येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन लोकांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
खालील कारणांमुळे तिकिटे कापण्याची शक्यता...
सामाजिक समिकरणांसह स्थानिक पातळीवरील राजकारण, विद्यमान खासदाराबाबत असलेली नाराजी, निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता, 3 पेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकिटाबाबत असलेले आक्षेप, या कारणांमुळे भाजप डझनभर विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्याच्या तयारीत असल्याचे बोललं जात आहे.
खासदारांची धाकधूक वाढली..
राज्यातील भाजपच्या सर्वच विद्यमान खासदारांचे पक्षाकडून तीन सर्व्हे करण्यात आले आहेत. ज्यात डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याचे या सर्व्हेमधून समोर आले आहे. सोबतच काहींना पक्षातून विरोध आहे, काहींची कामगिरी समाधानकारक नाही, काही ठिकाणी सामाजिक समिकरणांमुळे निवडून येण्याची शक्यता कमी आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून या डझनभर विद्यमान खासदारांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक खासदारांची धाकधूक वाढली आहे.
No comments:
Post a Comment