परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी येथीलश्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी महाशिवरात्री निमित्त भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. रात्री बारा वाजेपासूनच वैद्यनाथ मंदिर परिसरात भाविकांच्या रांगा सुरू झाल्या. हर हर महादेव, श्री प्रभू वैद्यनाथ भगवान की जय, असा जयघोष करीत भाविक दर्शन घेत आहेत.
महाशिवरात्रीनिमित्त राज्य व पर राज्यातून भाविक श्री वैजनाथांच्या दर्शनासाठी परळीत दाखल झाले आहेत, धर्मदर्शन घेऊ इच्छिणाऱ्या महिला व पुरुषांची रांग व पास धारकांची स्वतंत्र रांग लावण्यात आली आहे. मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे . रात्री बारा वाजल्यापासूनच भाविकांची वैजनाथ मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी सुरू झाली असल्याची माहिती वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी प्रा बाबासाहेब देशमुख यांनी दिली
No comments:
Post a Comment