लंगडा लालावर राज्यात 70 ते 80 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ व त्यांच्या पोलीस कर्मचार्यांनी ही मोठी कारवाई केली आहे.
शहरात मागच्या काही दिवसांपासून घरफोड्यांच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. त्यानुसार बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोड्यांच्या प्रकरणात शितलकुमार बल्लाळ यांनी लक्ष घालून तपास सुरू केला होता. त्यानुसार धोंडीपुरा भागातील एका घरफोडीच्या प्रकरणात आगामीर खान उर्फ लंगडा बद्दल शितलकुमार बल्लाळ यांना माहिती मिळाली होती. सदर आरोपी हा पालीच्या घाटात असल्याचे कळाल्यानंतर बी.बी.राठोड, श्री.सिरसाठ, श्री.पवार, श्री.वायकर, अशपाक सय्यद, मनोज परजणे यांनी आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी त्याने धोंडीपुरा भागातील चोरीची कबुलीही दिली. या आरोपीवर राज्यात ठिकठिकाणी 70 ते 80 गुन्हे दाखल असल्याची माहिती असून शहर पोलिसांना अट्टल घरफोड्या करणारा आरोपी जेरबंद करण्यात मोठे यश मिळाले आहे.

No comments:
Post a Comment