Friday, March 15, 2024

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पूर्वी समाज मंदिर व बौद्ध विहाराची रंगरंगोटी करा.नगरपरिषदेला निवेदनाद्वारे मागणी.

बीड (प्रतिनिधी) :- बीड शहरातील बौद्ध विहार व समाज मंदिराची रंगरंगोटी करण्यात यावी या मागणीचे निवेदन दिनांक 14 मार्च रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने नगरपरिषद कार्यालयामध्ये देण्यात आले या निवेदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव बीड शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो परंतु कोविड काळापासून बीड शहरातील बुद्ध विहार व समाज मंदिरांना रंगरंगोटीचे काम झालेले नाही यामुळे समाजबांधवांमध्ये नगरपालिका विषयी नाराजीचे वातावरण तयार झाले आहे. या वर्षी तरी बीड शहरातील बौद्ध विहार व समाज मंदिरांचे रंगरंगोटीचे काम करून देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे बीड शहराध्यक्ष अविनाश जोगदंड यांनी निवेदनाद्वारे केले आहे जर रंगोटीचे काम झाले नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीड शहराध्यक्ष अविनाश जोगदंड यांच्या वतीने अमर भूपोषण करण्यात येईल असाही इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी बीड शहराध्यक्ष अविनाश जोगदंड भैय्या मस्के यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment