या अपघातात पिकअप गाडी पलटी झाली असून ट्रँक्टरचे पाठीमागची चाके तुटून बाजुला पडली.
पुणे (प्रतिनिधी) : बाळुमामाच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या करमाळा येथील भाविकांचा भीषण अपघात झाला आहे. धार्मिक कार्यक्रम उरकून घरी परतत असताना न्हावरे - तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील दहिवडी घाट येथे पिकअप जीप आणि ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर जबर धडक झाली.
या भीषण अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्वजण करमाळा जिल्हा सोलापूर येथील रहिवाशी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही अपघात एवढी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघात कसा झाला?
करमाळा येथील भाविक बाळुमामाच्या पालखी तळावर जेवणाची पंगत आणि धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व भाविक परतीच्या मार्गावर पिकअप गाडीतून करमाळ्याच्या दिशेने निघाले होते.
न्हावरे - तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील दहीवडी घाटात तळेगाव ढमढेरेच्या दिशेने येणारे तसेच भाविक बसलेले पिकअप आणि न्हावरेच्या दिशेकडून येणारा ट्रँक्टर यांच्यात समोरासमोर धडक झाली. ट्रँक्टर चालक चुकीच्या दिशेने वाहन चालवत असल्याने हा अपघात झाला. या अपघातात पिकअप गाडी पलटी झाली असून ट्रँक्टरचे पाठीमागची चाके तुटून बाजुला पडली. तसेच या भीषण अपघातात दोन्ही वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात झाल्यांनतर ट्रँक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
अपघातात जखमी झालेल्याची नावे
चोपडे (वय ४०)
श्रुती दुर्गडे (वय ३०)
शोभा परमेश्वर महानवर (वय ५५)
मिना वाघमोडे (वय ४५)
सावित्री आशिष पाटील (वय ४०)
रुपाली अण्णा केसकर (वय ३०)
कविता युवराज बोराटे (वय ३५)
अंजली महारनोर (वय ७)
No comments:
Post a Comment