धाराशिव (प्रतिनिधी) : दोन महिन्याच्या बाळाचा पेंटाचे इंजेक्शन दिल्यानंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील जुनोनी येथे घडली आहे. इंजेक्शन दिल्यानेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप आई-वडिलांनी केला आहे.
आज (२ मार्च) दुपारी गावातील अंगणवाडीमध्ये बाळाला तीन इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर काही तासातच बाळाचा मृत्यू झाला. बाळ उठत नसल्याने नातेवाईकांनी बाळाला जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले.
तिथे डॉक्टरांनी तपासणी करून बाळाला मृत घोषित केलं. शवविच्छेदनाचा अहवाल आल्याशिवाय बाळाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.
इंजेक्शन दिल्यानंतर बाळ अर्धा तास खेळत होतं, त्यानंतर काही वेळ झोपलं. मात्र त्यानंतर बाळ उठलंच नाही, अशी माहिती बाळाच्या वडिलांनी दिली.
बाळाला तीन इंजेक्शन दिले होते. अंगणवाडीत बाळाला इंजेक्शन दिलं होतं. मात्र त्यानंतर बाळ उठत नव्हतं म्हणून दवाखान्यात नेलं तर डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केल्याची माहिती आईने दिली.
No comments:
Post a Comment