याबाबत अधिक माहिती अशी की, पनवेल रेल्वे स्थानकावर पीडित मुलगी आपल्या आईसोबत झोपली होती. यावेळी आई लघुशंकेसाठी गेली असल्याचा गैरफायदा घेत नराधमाने ३ वर्षाच्या चिमुकलीला उचलून नेत जवळच असलेल्या निर्मनुष्य जागेत नेत तिच्यावर अत्याचार करुन तिथून पळून काढला. आई परत आल्यानंतर मुलगी गायब झाल्याचे लक्षात येताच शोधाशोध करत पनवेल रेल्वे पोलीस ठाणे गाठत याबद्दलची माहिती देण्यात आली.
यावेळी पोलिसांनी तपास सुरु केला असता सदर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पनवेल रेल्वे पोलिसांनी तात्काळ 3 टीम बनवत आरोपीचा शोध सुरु केला.
दरम्यान, पोलिसांनी शोध घेतल्यानंतर जुईनगर रायळेलाय स्थानकावर मनोज कुमार या संशयित इसमाला ताब्यात घेतले. त्याची कसून तपास केला असता त्याने गुन्हा कबूल केला आहे. तसेच तो कळंबोली ब्रिजखाली वास्तव्य करत असल्याचीही माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून चिमुकलीवर पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
No comments:
Post a Comment