मुंबई - आज मंत्रालयात बीड जिल्ह्यातील HVDS अंतर्गत असणाऱ्या कामांच्या पूर्ततेसाठी ऊर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आ.प्रकाश सोळुंके साहेब, आमदार संदीप क्षीरसागर आ.नमिता मुंदडा व ऊर्जा विभागाचे संचालक प्रकल्प संजय टाकसंडे, कार्यकारी संचालक प्रकल्प प्रसाद रेशमे, अधीक्षक अभियंता महावितरण श्री.कोलप सर व अन्य वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
या बैठकीत HVDS अंतर्गत असणारी कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी आग्रही मागणी करण्यात आली यासह बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डीपी संदर्भातील काही तक्रारी बैठकीत मांडून बीड जिल्ह्यासाठी अतिरिक्त डीपी तसेच ३३ केवी ची प्रलंबित कामे पूर्ण व्हावेत मागणी केली.
आपल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ना.प्राजक्त तनपुरे साहेबांनी तातडीने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भाने निर्देश देत HVDS ची कामे व अन्य रखडलेली एप्रिल महिन्याअखेर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच बीड जिल्ह्यासाठी अतिरिक्त डीपी देण्याबाबत निर्देश दिले आहे
No comments:
Post a Comment