* मुंबई विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक अध्ययन केंद्रातर्फे दुर्दम्य लोकमान्य या माहितीपटाचे प्रदर्शन व चर्चासत्र
मुंबई, दि. १० फेब्रुवारी: मुंबई विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक संशोधन व अभ्यास केंद्र आयोजित राष्ट्रीय स्तरीय मराठी, हिंदी व इंग्रजी भाषिक वक्तृत्व स्पर्धा दिनांक, ३, ४ व ५ फेब्रुवारी २०२२ रोजी आभासी माध्यमातून पार पडली. राज्याच्या विविध भागातून या स्पर्धेस भरघोस प्रतिसाद मिळाला असून नाशिक, पुणे, कोल्हापूर, देवगड, रायगड, उरण, मुंबई, ठाणे, गुहागर, वेळणेश्वर, चिपळूण, रत्नागिरी,इ. अशा विविध ठिकाणावरून एकूण ९० महाविद्यालयातील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ पत्रकार मृण्मयी रानडे व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ प्रमोद खराटे यांनी केले. लोकमान्य टिळक स्पर्धेचे प्रथम पारितोषिक (रुपये ५००० रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र) श्रावणी साटम, चेतना महाविद्यालय, मुंबई, तर द्वितीय पारितोषिक (रुपये ३००० रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र) शिवानी शर्मा, टिळक इंदूताई कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पुणे व तृतीय पारितोषिक (रुपये २००० रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र) सारा नायर, विवेकानंद एज्युकेशन सोसायटी, मुंबई यांना प्राप्त झाले आहे. उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक लक्ष्मी मिनाक्षी, पी. आर. अभिनव एज्युकेशन सोसायटी ऑफ लॉ, पुणे तर उत्तेजनार्थ द्वितीय अजित सिंग, गुरू नानक खालसा महाविद्यालय, मुंबई यांना प्राप्त झाले.
No comments:
Post a Comment