Friday, February 4, 2022

आंदोलनकर्त्या महिलांच्या मानवी हक्काची हेळसांड केल्याबद्दल जिल्हाधिकारी बीड यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यासाठी मानव आधिकार आयोग, राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, राज्य महिला आयोग यांना तक्रार .

____
 न्याय हक्कासाठी जिल्हाप्रशासन दरबारी आंदोलनकर्त्या महिलांकडे दुर्लक्ष करत त्यांच्या मानवीहक्काची हेळसांड करत दुर्लक्ष करत न्याय नाकारल्याबद्दल जिल्हाप्रशासनातील वरिष्ठ जबाबदार आधिकारी राधाबिशन शर्मा यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान,राज्यपाल, मानव आधिकार आयोग दिल्ली, मानव आधिकार आयोग महाराष्ट्र राज्य सचिव तुकाराम मुंढे, तसेच लोकप्रतिनिधींना केली असून संबधित प्रकरणात जिल्हाप्रशासनातील वरिष्ठ जबाबदार आधिकारी म्हणून जिल्हाधिकारी बीड यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 

स्मशानभुमीत आठवडाभर आमरण उपोषण व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कडाक्याच्या थंडीतच प्रसुती 
____
श्रीमती तारामती अर्जुन साळुंके रा. पाली ता.जि.बीड यांचे पतीच्या आत्मदहनास कारणीभूत प्रशासनातील आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी आठवडाभर पतीचे अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या स्मशानभुमितच आमरण उपोषणास बसल्या असून आठवडाभर प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलीच नाही. 
तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ११ दिवसापासुन घरकुलाच्या जागेसाठी उपोषणास बसलेल्या मनिषा विकास काळे वय २३ वर्षे या महिलेची कडाक्याच्या थंडीतच उपोषण स्थळी प्रसुति झाली असून शासनाच्या निष्काळजीपणाचा निषेधार्थ दवाखान्यात जाण्यास नकार दिला असून संबधित प्रकरणात जबाबदार म्हणून जिल्हाधिकारी बीड राधाबिशन शर्मा यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, महिला व बालकल्याण मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना केली आहे.

मानव आधिकार दिल्ली आयोग व मानव आधिकार आयोग सचिव महाराष्ट्र राज्य तुकाराम मुंढे यांना तक्रार 
___
उपोषणकर्ते महिलांच्या मानवी हक्काची हेळसांड केल्याबद्दल मानवी हक्क आयोग दिल्ली तसेच अध्यक्ष व सचिव महाराष्ट्र राज्य मानव आधिकार आयोग तुकाराम मुंडे यांना तक्रार केली असून संबधित प्रकरणात जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.


राज्य महिला आयोग अध्यक्षासह महिलालोकप्रतिनिधींना कडुन न्यायाची अपेक्षा 
_____
  राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रूपालीताई चाकणकर,यांच्यासह महिला लोकप्रतिनिधी खा. सुप्रियाताई सुळे, खा.प्रितमताई मुंडे, पंकजाताई मुंडे, आ.नमिताताई मुंदडा यांना श्रीमती तारामती अर्जुन साळुंके व प्रसुत महिला मनिषा विकास काळे यांच्यावर झालेल्या अन्याबद्दल तक्रार करण्यात आली असुन न्याय मिळवुन देण्याची विनंती करण्यात आली आहे. 


No comments:

Post a Comment