बीड जिल्ह्यातील पाच पैकी तीन नगरपंचायतीत भाजपचा बोलबाला. तर वडवणीत राष्ट्रवादी.
बीड (प्रतिनिधी) जिल्हयातील पाच नगरपंचायतच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत वडवणीत राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व सिद्ध केले तर केज मध्ये जनविकास आघाडीने यश मिळवले. आष्टी पाटोदा शिरूर वर भाजपचा वरचष्मा राहिला.
नगर पंचायतच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत वडवणी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ने तर केजमध्ये आघाडी आणि आष्टी,पाटोदा शिरूरमध्ये भाजपने बाजी मारली प्रतिष्ठित अशा वडवणीमध्ये भाजपचे सदस्य गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादीने बाजी मारली . नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक पार पडली त्यात आष्टी नगरपंचायत नगराध्यक्षपदी सौ.पल्लवी स्वप्निल धोंडे यांची बिनविरोध निवड तर उपनगराध्यक्षपदी शैलेश सहस्त्रबुद्धे यांची बिनविरोध निवड झाली. पाटोदा नगरपंचायत नगराध्यक्षपदी सय्यद खतीजाबी सय्यद अमर यांची बिनविरोध निवड तर उपनगराध्यक्षपदी शरद बांमदळे यांची निवड झाली. शिरूरकासार नगरपंचायत नगराध्यक्षपदी सौ.प्रतिभा रोहिदास गाडेकर यांची निवड उपनगराध्यक्षपदी श्वेता प्रकाश देसरडा यांची निवड झाली.केज नगराध्यक्ष पदी सीताबाई बन्सोड आणि उपाध्यक्ष पदी शीतल पशुपतीनाथ दांगट यांची बिनविरोध निवड झाली. प्रतिष्ठित अशा वडवणी नगर पंचायत मध्ये चुरस होईल अशी शक्यता होती.मात्र आज भाजपचे आठ सदस्य गैरहजर राहिल्याने सौ वंदना शेषेराव जगताप यांची अध्यक्षपदी आणि बन्सी मुंडे यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वडवणी नगर पंचायतीच्या निवडणुकीत मात्र दोघं बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागली होती अश्या या चुरशीच्या लढतीत मात्र राष्ट्रवादीने बाजी मारली तर बीड जिल्ह्यातील एकूण 5 नगर पंचायती पैकी 3 नगर पंचायतीवर मात्र पंकजा मुंडे यांचे वर्चस्व राहिले आहे.
No comments:
Post a Comment