बीड ( प्रतिनिधी ) राज्य सरकारने किराणा दुकानांमधून वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय चुकीचा असून समाजात हिताचा नाही. त्यामुळे तो निर्णय रद्द करावा. या मागणीचे निवेदन आज जन आंदोलनाच्या जिल्हा आणि अकरा तालुक्यातील तालुका शाखांनी जिल्हाधिकारी आणि त्या त्या भागातील तहसीलदारांना देऊन केली आहे.

सुपर मार्केट आणि दुकानांमधून वाईन विक्रीमुळे व्यसनाधीनता वाढेल. त्याचप्रमाणे घरापर्यंत दारू पोहोचत असल्याने दारू पिणार यांची संख्या देखील वाढेल. त्यामुळे हे धोरण समाज विघातक ठरणारे आहे. म्हणून हे धोरण तात्काळ सादर करावे, अशी मागणी जन आंदोलन मार्फत करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्हाधिकारी आणि अकरा तहसीलदार मार्फत देण्यात आलेले आहेत. यानंतरही जर यात कारवाई झाली नाही, तर मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

जनआंदोलनाचे सर्व तालुक्यातील कार्यकर्ते आज या आंदोलनामध्ये सहभागी झाले. विश्वस्त ऍड. अजित देशमुख जिल्हाध्यक्ष गोवर्धन मस्के यासह तालुकाध्यक्ष सर्वश्री रंजीत चव्हाण, बापू थोरात, कादर मकराणी, नवनाथ नाईकवाडे, अशोक जंगले, नारायण वाघमारे जालिंदर देशमुख परमेश्वर गीते, शिवाजी यादव, संदीपान थोरात यांनी ही निवेदने दिली. कार्यकर्त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.