औरंगाबाद (प्रतिनिधी) :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत्या १९ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे. यानिमित्ताने यंदाची ही शिवजयंती समाजाभिमुख उपक्रमांनी साजरी करण्यात येणार असून जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शुक्रवारी वेरूळच्या छत्रपती शहाजी महाराज स्मारक व मालोजीराजे यांच्या गढीवर सकाळी ध्वजारोहण व अभिवादन औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
उत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख यावेळी बोलताना म्हणाले की, वेरुळ येथील गढीच्या परिसरातील केर-कचरा उचलून स्वच्छता अभियान महोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहभागाने राबविले. आपले गड-किल्ले स्वच्छ, आणि सुंदर राहिले पाहिजे त्यांचे ऐतिहासिक संवर्धन झाले पाहिजे आणि शिवप्रेमी तसेच पर्यटकांनीही याची जाणीव ठेवली पाहिजे यासाठी शिवजयंती निमित्ताने संकल्प करून स्वच्छता अभियान राबविले असल्याचे अभिजित देशमुख यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी उत्सव समितीचे कार्याध्यक्ष अनिल मानकापे, प्रा. मनोज पाटील, महेश उबाळे, प्रशांत शेळके, प्रशांत हुरणे, संतोष चादरे, सचिन मोतींगे, दादाराव कुबेर, दिनेश सावजी, सरपंच प्रकाश पाटील, अरुण तंबारे, फिरोज पठाण, मंगेश मिसाळ, योगेश मिसाळ, सतीश काळे, प्रवीण भोसले, बबाळासाहेब औताडे, विशाल दाभाडे, प्रकाश मते, संदीप शेळके, अनिकेत पवार, यांची उपस्थिती होती.
औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा शिवजयंती महोत्सव साजरा होत असून औरंगाबादच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या औरंगाबाद शहरातील शिवजयंतीचा सोहळा यावर्षी अविस्मरणीय ठरणार आहे. गेल्या ९ वर्षापासून सातत्याने शिवप्रेमींनी पाठपुरावा केल्यानंतर क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा विराजमान झाला असून हा क्षण डोळे दिपवणारा आणि ऐतिहासिक असा अविस्मरणीय क्षण प्रत्येक शिवप्रेमींसाठी असणार असे अभिजित देशमुख म्हणाले.
औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने यावर्षी अत्यंत आगळ्यावेगळ्या समाजाभिमुख अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शिवजयंती निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. असेही श्री देशमुख म्हणाले.
वृक्षारोपण व शिवचरित्र पारायण
हडको येथे दि. १३ फेब्रुवारी रोजी रमेश इधाटे, संदीप सपकाळ, ज्ञानेश्वर शेळके यांच्या आयोजनात सकाळी १० वाजता वृक्षारोपण करण्यात येईल. तर दि. १३ ते १९ फेब्रुवारी दरम्यान सकाळी ८.३० ते ११.३० यावेळेत क्रांती चौक येथे प्रा. चंद्रकांत भराट यांच्या संयोजनात छत्रपती शिवचरित्र पारायण सप्ताह (वाचन) आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment