Thursday, February 10, 2022

अंबाजोगाईत विद्यार्थ्याला चामड्याच्या बेल्टने मारहाण, शाळेत उत्तर देण्यावरून 2 विद्यार्थ्यांनी क्लासमेंट विद्यार्थ्यावर भरचौकात हल्ला चढवला !


अंबाजोगाई  दि. 10 – शाळेत हिंदीचा तास सुरु असताना शिक्षिकेने विचारलेल्या प्रश्नावर एका विद्यार्थ्याने उत्तर दिले. मात्र, तीन विद्यार्थ्यांना याचे उत्तर देता आले नाही. याचा राग मनात धरून शाळा सुटल्यावर उत्तर देणार्या विद्याथ्यावर उत्तर न आलेल्या विद्यार्थ्यांनी हल्ला चढवून मारहाण केली. आंबेडकर चौकातील ई लाईट लर्निंग कोचींग सेटंर समोर पीडित विद्यार्थ्यावर अन्य दोन विद्यार्थ्यांनी बेल्ट व लोखंडी गजाने मारहाण केली. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात मारहाण झालेल्या विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितले की, रा. कांदेवाडी ता. धारुर हा.मु. मोरेवाडी अंबाजोगाई या ठिकाणचा तो राहणारा आहे. पीडित विद्यार्थी अंबाजोगाई येथील छत्रपती संभाजी राजे ग्लोबल स्कूलमध्ये इयत्ता 10 वी वर्गात शिक्षण घेत आहे. दि 08/02/2022रोजी सकाळी दहा वाजता पीडित विद्यार्थी रोजच्या प्रमाणे शाळेत होता. शाळेमध्ये हिन्दी विषयाचा तास सुरु असताना हिंदीच्या शिक्षीका वैशाली शिंदे यांनी वर्गातील चार ते पाच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले. या प्रश्नावर पीडित विद्यार्थ्याने उत्तर दिले पण त्याच्या सोबत असलेल्या तीन विद्यार्थ्यांना प्रश्नाचे उत्तर देता आले नाही.

तेव्हा शाळेतील तास पूर्ण झाल्यानंतर उत्तर न आलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकाने पीडित विद्यार्थ्याला तुला लई ऊत्तर येतात का ? तु शाळा सुटल्यावर भेट ? मी तुला दाखवतो असे म्हणून त्या विद्यार्थ्याने पीडित विद्यार्थ्याला शिवीगाळ केली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर पीडित विद्यार्थी स्कुटीवर बसून आंबेडकर चौकातील ई लाईट लर्निंग कोचींग सेटंर समोर बसला होता. तेथे उत्तरे न आलेले दोन विद्यार्थी व इतर तीन आनोळखी मुले पीडित विद्यार्थ्याजवळ आले. 

तेव्हा एका विद्यार्थ्याने त्याचे हातातील चामडी बेल्टने पीडित विद्यार्थ्याच्या पाठीवर मारहाण केली. तर दुसर्या विद्यार्थ्याने  त्याच्या हातातील लोखंडी गजाने पीडित विद्यार्थ्याच्या देन्ही हातावर मारून दुखापत केली व इतर आनोळखी तीन जणांनी पीडित विद्यार्थ्याला लाथाबुक्याने मारहाण केली. तेव्हा तेथे बाजुला आसलेले वडापाव वाल्याने पीडित विद्यार्थ्याची त्यांच्या तावडीतून सोडवले. व पीडित विद्यार्थ्याला त्याच्या स्कुटीवर बसवून घरी पाठून दिले.

नंतर घडलेला प्रकार शिकवणीच्या सरांनी पीडित विद्यार्थ्याच्या वडीलांना फोन करून सांगितला. त्यानंतर वडिलांनी पीडित विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करून औषधोउपचार घेतला. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीनंतर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात दोन विद्यार्थी व तीन अनोळखींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


No comments:

Post a Comment