Tuesday, February 4, 2020

एल.आय.सी .मधील आपला अंशता हिस्सा आयपीओ च्या माध्यमातून विकण्याचा प्रस्ताव ठेवल्याच्या निषेधार्थ परळीत लाक्षणिक संप.


परळी: केंद्र सरकारने सादर केलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात एल आय सी मधील आपला हिस्सा अंशता आयपीओ च्या माध्यमातून विकण्याचा प्रस्ताव ठेवल्याच्या निषेधार्थ येथील एल आय सी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एक तासाचा लाक्षणिक संप केला . केंद्र सरकारने एलआयसीची भागीदारी अंशतः विकण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे या निर्णयास अनुसूचित जाती -जमाती एलआयसी कर्मचारी संघटनेच्यावतीने कडाडून विरोध दर्शविला आहे या निर्णयाचा निषेध म्हणून एलआयसीच्या परळी येथील सॅटेलाइट कार्यालयात मंगळवारी दुपारी साडेबारा ते एक च्या दरम्यान कर्मचारी संपात सहभागी झाले होते अशी माहिती येथील कर्मचारी संघटनेचे नेते विजयकुमार रोडे व बाळासाहेब कांबळे यांनी दिली एलआयसी ची भागीदारी चा निर्णय घेण्यात आला आहे . या निर्णयाचा विजयकुमार रोडे,बाळासाहेब कांबळे यांनी आज निषेध नोंदविला आहे

No comments:

Post a Comment