मुंबई: अमरावतीतील चांदुर रेल्वे येथील महिला कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात विद्यार्थिनींना 'मी प्रेमविवाह करणार नाही' अशी शपथ देण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. माजी महिला-बालकल्याण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी 'ही शपथ मुलींनाच का?', असा खरमरीत प्रश्न विचारत या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
'कॉलेजात मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ देणे हा कमालीचा विचित्र प्रकार आहे. ही शपथ मुलींनाच का? आणि ती ही प्रेम न करण्याची... त्यापेक्षा मुलांनी शपथ घ्यायला हवी की, एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही. कोणावर अॅसिड फेकणार नाही, कुणाला जिवंत जाळणार नाही. कुणाकडे वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला चोख प्रत्युत्तर देईन' अशा तीव्र भावना पंकजा यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.
No comments:
Post a Comment