Wednesday, February 12, 2020

पत्रकार सुरक्षा समितीच्या ठाणे जिल्हा पदाधिकाऱ्यांची प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी घेतली भेट.


अंबरनाथ :- प्रतिनीधी 
पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष *मा.यशवंतराव पवार* यांच्या अध्यक्षतेखाली   अंबरानाथ येथील *शासकीय विश्राम गृह, झेंडा चौक,  अंबरनाथ पूर्व* येथे सर्व तालुका अध्यक्ष,  पदाधिकारी व सदस्य यांची बैठक झाली. यावेळी यशवंत पवार यांनी उपस्थित पत्रकार पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना तळागाळातील व आजपर्यंत दुर्लक्षित असलेल्या पत्रकार बंधूंना कुणीही विचारीत नाही. त्याना योग्य मोबदला व न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आपली समिती करेल. पत्रकार हा घटक वृत्तपत्रात काम करणारा प्रत्येक व्यक्ती येतो. मग तो डीटीपी ऑपरेटर असो की वृत्तपत्र विक्रेता, वा घराघरात आपले वर्तमान पत्र वाटणारा असो पण हे सगळे आज दुर्लक्षित राहिले. तसेच पत्रकार सुरक्षा कायदा अंतर्गत येणारे अडथळे, ज्येष्ठ पत्रकाराना पेन्शन योजना,  घरकुल योजना, आणि सर्वच पत्रकाराना राज्यभर टोलमुक्त असे प्रस्ताविक आंदोलन व योजना असुन एकत्र येऊन हा लढा देणे गरजेचे आहे. मी सुटाबुटातील पत्रकार नाही,  सामान्य व्यक्ती असुन महाराष्ट्रात सर्व पत्रकाराची एकजूट करून पत्रकार सुरक्षा समितीतर्फे न्याय हक्कांची लढाई लढायची आहे. असे परखड मत यशवंत पवार यांनी मांडले.
वामन उगले यांनी माहिती अधिकारात उल्लेखनीय कामाचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला. अंबरनाथ तालुका अध्यक्ष अशोक नाईक, उपाध्यक्ष अजयराव चीरवेल्ला, खजिनदार जाफर वणू, सहसचिव शालिक पाटील, सचिव प्रवीण राणे, प्रसिध्दप्रमुख संतोष तिवारी, याना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख राजाभाऊ पवार ,  कोकण विभागीय अध्यक्ष गौसखान पठाण, रायगड जिल्हा संघटक आनंद सपकाळ, रायगड जिल्हा अध्यक्ष खालिल सुर्वे, उपाध्यक्ष नरेश जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कल्याण चे रघुनाथ सूरडकर, दीनानाथ कदम, संदेश लोंढे, रामेश्वर गवई काका भोसले, संजय साळवे सह अनेक पत्रकार हजर होते. काशिनाथ भोसले यांनी उपस्थिताचे स्वागत करून प्रस्तावना केली.ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मनोज जैन यांनी सर्वाचे आभार मानले.

No comments:

Post a Comment