Thursday, February 13, 2020

जय महाराष्ट्र महिला संघटना व कांतीकारी साथी यांच्या संयुक्त विद्यामाने छञपती शिवाजीराजे जयंती विविध उपक्रमाने साजरी होणार .सौ.वर्षा मगर


परळी वैजनाथ ;- (प्रतिनीधी ) येथे प्रति वर्षाप्रमाणे या ही वर्षी जय महाराष्ट्र महिला संघटना व कांतीकारी साथी यांच्या संयुक्त विद्यामाने छञपती शिवाजी महाराजांची जंयती विविध उपक्रमाने साजरी करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या अध्यक्षा व कांतीकारी साथीच्या संपादक सौ .वर्षा मगर यांनी केले .त्या शिवजन्मोत्सोवा निमित्त आयोजीत संघटनेच्या बैठकीत बोलत होत्या . यावेळी अनेक महिलांनी नवनविन उपक्रम सुचविले .त्या सर्व उपक्रमाचा  समावेश करण्याचे ठरले .यावेळी झालेल्या या बैठकीला जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या अध्यक्षा व कांतीकारी साथी च्या संपादक सौ .वर्षा मगर व संघटनेच्या सर्व पदधिकारी .आईसाहेब जिजाबाई सेवा संस्थेचे सर्व पदधिकारी .महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

No comments:

Post a Comment