Sunday, February 9, 2020

"कोरोना व्हायरस व सत्य!"प्रा. डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी.



संपूर्ण जगात चीन हा देश फसव्या मालामुळे, प्रवृत्तीमुळे व त्यांच्या लोकसंख्येमुळे प्रसिद्ध आहे. 
जगण्यासाठी, व स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी ते अघोरी मार्ग पत्करतात म्हणूनच अमेरिकेसारखे पुढारलेले देश चीनवर निर्बंध लादतात व आपल्या देशाचे आरोग्य व स्थैर्य अबाधित राखतात. आपण भारतीय वाढती लोकसंख्या, स्वकष्टाचा वाढत चाललेला अभाव, सोशल मीडियामुळे खोट्या गोष्टींचा, माहितीचा, बुद्धीवर होणारा वाढता चुकीचा प्रभाव, यामुळे भारतीय तरुण खरतर एक ताकद बनून देशासमोर यायला हवी आहे तिथे पबाजी सारखे मोबाईल गेम, गुटखा, दारू, ड्रग, यामध्ये गुंतून , स्वतःचे कर्तव्य विसरून आत्महत्या, अत्याचार, गुन्हेगारी यामध्ये फसताहेत व स्वतःचाच बळी देताहेत हे अत्यंत खेदाची बाब आहे. शेती, शिक्षण व संरक्षण या तीन क्षेत्रांचे प्रभावी कार्य हेच भारताच्या पुढील खरे आव्हान आहे.
या तरुण पिढीला पुनः भारताच्या प्रगती मध्ये आणायचे असेल तर या तिन्ही क्षेत्रांना सक्षम बांवलेच पाहिजे. यासाठी राजकारण्यांनी भ्रष्टाचाराला ठार न देता, कायदा व कार्य सक्षमतेला महत्व देणे गरजेचे आहे.
चिनी माल फसवा असतो हे माहीत असूनही आपण हव्यासापोटी तो घेतो वापरतो व पुनः पुनः फसत राहतो, निसर्ग नियम तोडू नका, आपणही निसर्गाचाच घटक आहोत हे विसरून चालणार नाही,कोरोना सारखे व्हायरस जागतिक तापमानवाढीचा परिणाम असू शकतील ही म्हणून precaution is better than cure हे लक्षात घेऊन उपाय अमलात आणणे आवश्यक आहे.
या समस्त जगात चीन इतका धूर्त व हुशार देश शोधून सापडणार नाही.  हुशार यासाठी की डुप्लिकेट तांदूळ, कोबी, औषधे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फटाके, खाद्यपदार्थ इतक्या बेमालूमपणे बनवतात की खरे कोबी व खोटे कोबी जर समोर ठेवले तर गिर्हाईक खोटा कोबीच खरेदी करेल कारण भुललिया वरलासी अंगा या उक्ती प्रमाणे रंग व रूप इतके बेमालूमपणे वापरलेले असते की पाहणारही भ्रमात पडावा.
आणि धूर्त यासाठी की चीन आपल्या बरोबर गरजा ओळखून त्या वस्तूंची निर्मिती करून मार्केट निर्माण करतो. अशा  लहान मुलांच्या खेळण्यांपासून असंख्य वस्तू मार्केट व्यापून आहेत.
हीच धोक्याची घंटा आहे, स्वतः सावरून इतरांनाही रोखलं पाहिजे, भारताची संस्कृती, अन्न पदार्थ, औषधे, शेती ही प्रमुख बलस्थाने आहेत, चीनने तेच ओळखून तरुणांना भुलवणे व शारीरिक, बौद्धिक दृष्ट्या कमकुवत बनवणे चालू केले आहे, याचाच भाग म्हणजे रोग निर्माण होत आहेत, बुद्धी मोबाईलमध्ये गुंगत आहे, व्यसने कमकुवत बनवत आहे. 
आयुष्याचा वेग वाढला आहे पण स्थैर्य नाहीस होणं भारताला महागात पडणार आहे.
अजूनही सावरणारे प्रयत्न करताहेत, आपणही आपले कर्तव्य पाळू या व तरुण पिढीला सदृढ व निरोगी बनवू या.
 चीनने निसर्गाची आजपावेतो जितकी वाट लावली आहे तितकी वाट ज गात कुठल्याही इतर देशाने लावली नसेलव. सध्या चा कोरोना व्हायरस हे ह्याच चीन च्या लोकांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या खोट्या रंग व चव बदलणाऱ्या गोष्टींमुळेच ताकद कमी झाल्यामुळे व व्हयरस ची ताकद वाढल्यामुळे प्रभाव वाढला आहे.
1958 साली सुद्धा ह्या चीनमद्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. माओ झेडोंग नावाचा त्यांचा पंतप्रधान तेव्हाच्या मागासलेल्या चीन ला औद्योगिकरणात तसेच चीनची अर्थव्यवस्था ब्रिटन व अमेरिका ह्यांच्या पेक्षा पुढे घेऊन जाण्यासाठी ह्या झेडोंग ने मुळात कृषिप्रधान असलेल्या चीनमध्ये four pests campaign  चालविले. ह्या कॅम्पेन चा विषय असा होता की पुढील चार कीटक व प्राणी चीनचे शत्रू आहेत.
त्यात, 
1)चिमणी
2)उंदीर
3)माश्या
4)मच्छर
उंदीर कमी झाल्याने , माश्या कमी झाल्याने, मच्छर कमी झाल्याने निसर्ग साखळीतील वनस्पती, वेली, बॅक्टरीया, यांच्यावर परिणाम होऊन अडथळा निर्माण झाला.
 जिवो जीवस्य जीवनम याप्रमाणे निसर्गाने प्रत्येकाचे कार्य ठरवले गेल्यासारखे बनवले आहे, त्याचा आपण मनुष्यप्राण्याने उल्लंघन केल्याने चीनला सतत फटका बसत आहे पण त्याबरोबरच इतर देशांनाही प्रादुर्भाव होत आहे.
निसर्गसाखळी खूप महत्त्वाची आहे नाहीतर आत्ता जसे जंगले, शेती क्षेत्र कमी झाल्याने जंगली प्राणी मानव वस्तीचा आधार शोधताहेत तसेच पुढे असे असंख्य विषाणू हवेतून, पाण्यातून मानवावर हल्ला करतच राहणार व निसर्ग नियमाप्रमाणे जो बलाढय त्याचंच वास्तव्य पृथ्वीवर वाढणार.
वातावरणातील तापमान वाढले की त्या तापमानात जगणारे,  विषाणू , जीव, जंतू निर्माण होणार व त्यांचा प्रादुर्भाव वाढणार, म्हणून वेळीच जागतिक तापमानवाढ नियंत्रित ठेवण्यासाठी निसर्ग संवर्धन गरजेचे आहे. उत्तम उदाहरण म्हणजे  ज्याप्रमाणे चीनच्या तत्कालीन अर्थ तज्ञ लोकांच्या म्हणण्यानुसार एक चिमणी एका वर्षात 4.5 किलो धान्य खाऊन टाकते. आणि ह्या सगळ्यांचा परिणाम चीन च्या अर्थव्यवस्थेवर होतोय असा त्यांचा समज झाला. ह्या कॅम्पेन अंतर्गत संपूर्ण चीन मधील जनता चिमण्या शोधून त्यांना मारण्याकरिता अक्षरश पिसाटल्यागत कार्यरत झाली. नुसती जनताच नाही तर चिनी सरकार ने ह्या कामात चीनच्या सैन्याला सुद्धा जुंपले होते. 
चिमण्यांना मारायची पद्धत अशी होती की," काही लोक चिमण्यांच्या मागे ढोल बडवीत पळायचे आणि ते तेव्हपर्यंत पिच्छा करायचे जेव्हपर्यंत चिमणी थकून जमिनीवर कोसळत नाही" 
करोडो चिमण्यांची कत्तल सरेआम ह्याच पद्धतीने करण्यात येत होती, कुठे चिमण्यांची घरटी दिसली तर त्यातील अंडी फोडली गेली.ह्या कत्तलीची भीषणता इतकी की कॅम्पेन सुरू झालं त्याच एका दिवसात 2 लाख चिमण्यांची कत्तल झाली. 1958 मध्ये सुरू झालेल्या कॅम्पेन ने 1 ते दीड वर्षात चीन मधल्या चिमण्या  नामशेष केल्या, संपूर्ण चीनमध्ये कुठे चिमणी दिसेच ना....!!
याचाच परिणाम होऊन कीटकनाशकांची निर्मिती करावी लागली कारण अश्या प्रकारे चिमणी ह्या निरुपद्रवी प्राण्याला सरसकट नामशेष केल्याने निसर्गाचं संतुलन भयंकर बिघडलं होत. आता वेळ माणसाची होती.
चिमण्यांना अश्या प्रकारे नामशेष केल्याने पिकावर जी कीटक पिकांचं नुकसान करतात त्यांची संख्या इतक्या झपाट्याने वाढली की त्यांना संपविण्यासाठी चीनला किटकनाशकांच उत्पादन कितीतरी टनांनी वाढवावं लागलं त्यात कीटक नाशक पिकांवर इतकं माराव लागायचं की कीटक मारणं तर दूरच राहील पिकेच खराब होऊ लागली. त्यात नाकतोडा (grasshopper) ची संख्या इतकी इतकी वाढली की झुंड च्या झुंड नाकतोडे पिकांवर यायचे आणि 1 ते 2 मिनिटांच्या आतच पूर्ण शेतातील पिके खाऊन जायची. झुंड गेल्यावर ती शेती अशी वाटायची की इथे काही पेरलंच नसावं. चीनने जे चिमन्यांसोबत म्हणजेच निसर्गसोबत केलेलं तेच निसर्ग त्यांच्या सोबत करत होता. 1960 साली शेवटी झेडोंग ला समजलं की आपण ज्या प्राण्याला संपविल तो एकप्रकारे आपली मदतच करत होता त्याने 1960 ला हा कार्यक्रम बंद केला. चिमण्या नामशेष झाल्या होत्या तर रशिया कडून चीन ने चिमण्या आयात केल्या. पण तेव्हपर्यंत वेळ निघून गेली होती. आता निसर्ग उत्तर देणार होता. 1958 ते 1961 ह्या 3 वर्षात 3 कोटी 60 लाखाच्या आसपास लोकांचा बळी फक्त उपासमारीने गेला. पीक नाहीतर अन्नच नाही. काही तज्ञ हा आकडा 4 कोटी 60 लाख असा वर्तवितात. ह्या तीन वर्षाच्या कालावधीला The great chinese famine नावाने ओळखतात ह्यावर लिहिलेलं यांग जिशेंग ह्या पत्रकारच्या tombstone नावाच्या पुस्तकात ह्या भीषण काळाचा उल्लेख विस्तृतपणे आहे सादर पुस्तक आजसुद्धा चीन मध्ये बॅन आहे. पण काळ कोणासाठी थांबत नाही.
आजही चीन ने ह्या सगळ्या प्रकारानंतर सुद्धा शिकवण घेतलेली दिसत नाही. हे ह्या कोरोना वरूनच दिसत. सर्रास प्राण्यांची कत्तल चालते. जे प्राणी जगात कुठेच खाल्ले जात नाहीत ते चीन मध्ये खाल्ले जातात. अश्याने चीन फक्त आणि फक्त निसर्गसोबत खेळ करतोय असे नाही तर असे काळात नकळत वागणाऱ्या प्रत्येकालाच याचे परिणाम सुद्धा भविष्यात चीन सोबत भोगायचे आहे. 
      भारतासारख्या सुसंस्कृत देशाला सीमाप्रश्नावरून चीन नेहमी त्रास देत आलाय,भारत अर्थव्यवस्थेत आपल्यापेक्षा मोठा होऊच नये यासाठी चीन पाकिस्तानला गुप्त मार्गाने शस्त्रास्त्रे पुरवतो, त्याची हावं वाढली आहे, कपट नीती वाढली आहे, प्रगतीकडे वाटचाल करत असलेल्या भारताला तो फसवेपणाने मारत आहे. आपण व राज्यकर्त्यांनी तरुणांना वेळीच सावध करून राष्ट्र कार्य व मानवता या चे महत्व पटवणारे शिक्षण व कौशल्य प्रदान केली पाहिजेत.
    चीनमधून भारतात येणाऱ्या नद्यांच्या पाण्यात सिमेंट्सदृश्य पदार्थ मिसळून पाणी दूषित करतो, भेसळ तर चालू आहेच, म्हणून प्रत्येक भारतीयांचे हे करत्व आहे की आपला तरुण व भावी पिढी सदृढ, ताकदवान व बुद्धिकौशल्य वर्धित बनवली पाहिजे. 
आज कोरोना ग्रस्त लोकांना सरळ मृत्यू मुखी देण्याची गोष्ट चीन करत आहे आणि तो तसे करायलाही मागेपुढे पाहणार नाही, माणूस म्हणून त्यांना स्वतः चिच जिथे किंमत नाही तिथे ते इतर देशातील लोकांची काय गय करणार?
     थोडक्यात काय तर संयुक्त राष्ट्रसंघ आणि जगासमोर स्वतः ला सोज्वळ प्रतिमा दाखवून भारतासोबत नेहमी *स्लोव पॉईझनिंगचा* खेळ खेळणाऱ्या चीनला आज *कोरोना* सारख्या व्हायरसने बरबाद करून टाकले आहे..  उद्योगधंदे ठप्प झाले,जगातल्या सर्व व्यापारी व उद्योजकांनी पाठ फिरवली, हजारो लोक दररोज मरत आहेत...कोरोना थांबण्यासाठी डॉक्टरपासून आर्मीपर्यंत सर्व क्रयशक्ती पणाला लागली , अब्जावधी भांडवल बुडाले. *चीन कंगाल झाला* स्वतः च्याच लोकांची कत्तल करण्यास प्रवृत्त झाला आहे
         शेवटी काय जो *दुसऱ्यावर स्लो पोईझनिंग करतो त्याला निसर्ग एक दिवस उत्तर देतो कारण निसर्ग सर्वश्रेष्ठ न्यायाधीश व निर्माता आहे*
आपण भारतीय आता तरी परिस्थिचा गांभीर्याने विचार करू या, शेतीतील कष्ट , खेळातील घाम, पायाखालची धरती व डोक्यावरील आकाशाचे छत्र यांनीच मनुष्य घडला आहे, आपली पुढील पिढीही सदृढ, समजदार, निसर्गाच्या ताकदीने बालस्थानाने चालणारी बनवू या , हीच खरी जगत नियंत्याची प्रार्थना सेवा ठरेल .

No comments:

Post a Comment