परळी (प्रतिनिधी): दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल, परळी वैजनाथ येथे स्वातंत्र्य दिन विविध देशभक्तीपर उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.या सोहळ्याची सुरुवात ध्वजारोहण आणि राष्ट्रगीताने झाली. प्रमुख अतिथी असणारे शाळेचे प्राचार्य मा.श्री.श्रीकांत पाटील सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी डी.डब्ल्यू.पी.एस. वंडरलँड च्या मुख्याध्यापिका स्वप्नाली टाले मॅडम, प्रशासक श्री.उमेश गायकवाड सर, ज्येष्ठ समन्वयक श्री. सुनील येवले सर व सन्माननीय पालकही उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी ‘स्वागतम् सुस्वागतम्, हा मानाचा मुजरा’ हे स्वागतगीत सादर केले.
विद्यार्थी परिषदेतील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी डंबेल्स ड्रिल्स व लेझीमचे आकर्षक सादरीकरण केले.इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी भारताचे महान क्रांतिकारक व राष्ट्रभक्त महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी होत त्यांच्या कार्याची ओळख उपस्थितांना करून दिली.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
याप्रसंगी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतावर सुंदर समूह नृत्य सादर केले, तर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनीही प्रभावी समूह नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.विद्यार्थ्यांच्या नृत्य सादरीकरणातून देशभक्ती, एकता, अनुशासन आणि राष्ट्रावरील प्रेम या मूल्यांचे सुंदर प्रतिबिंब दिसून आले.
सदरील कार्यक्रमात प्राचार्य मा.श्री.श्रीकांत पाटील यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी क्रांतिकारकांनी केलेल्या त्याग व बलिदानाची माहिती देत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व समजावून सांगितले. देशाच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक बनून आपली कर्तव्ये पार पाडावीत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच चि.अथर्व मिश्रा, रुद्र घुगे व आदित्य डिकले या विद्यार्थ्यांनीही आपल्या भाषणातून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व व देशप्रेमाच्या भावना व्यक्त केल्या.
शाळेचे मार्गदर्शक व प्रेरणास्त्रोत मा.श्री.किरण गित्ते सर (IAS) मुख्यमंत्री सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग, त्रिपुरा सरकार, विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते मॅडम यांचे सुपुत्र चि.शौर्य दादा किरण गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल, डी डब्ल्यू पी एस वंडरलँड च्या विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गीताच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चि. नारायण मुंडे, आयुष गडदे, कु.आर्या लिंबकर व यशश्री दौंड या शाळेतील विद्यार्थ्यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी आनंद काटापुरे सर यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे आभार मानले. देशभक्ती, शिस्त आणि उत्साहाने भारलेल्या वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.हा कार्यक्रम प्रेरणादायी आणि उत्साही सादरीकरणांनी भरलेला होता, यासाठी शाळेचे मार्गदर्शक व प्रेरणास्त्रोत मा.श्री.किरण गित्ते साहेब (IAS) मुख्यमंत्री सचिव, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग, त्रिपुरा सरकार, विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा : सौ.उषा किरण गित्ते मॅडम व शाळेचे प्राचार्य मा.श्री.श्रीकांत पाटील सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment