धर्मगुरू बाबुसिंग महाराज,आ. धनंजय मुंडे, ना.पंकजाताई मुंडे, सौ.मोहिनीताई इंद्रनील नाईक यांच्या हस्ते डी. एस.राठोड यांचा सत्कार
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सिरसाळा येथे आयोजित भव्य जयंती महोत्सवात 'बीड भूमिपुत्र' पुरस्काराने सन्मानित झालेले राजर्षी शाहू महाराज कौडगाव हुडा संस्थेचे अध्यक्ष तथा वसंतनगर तांडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डी. एस. राठोड यांचा धर्मगुरू बाबुसिंग महाराज,आ. धनंजय मुंडे, ना.पंकजाताई मुंडे, सौ.मोहिनीताई इंद्रनील नाईक व मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या शिक्षण, समाजसेवा आणि ग्रामविकासातील उल्लेखनीय कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सिरसाळा येथे आयोजित भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दैनिक लोकमत यांच्या प्रतिष्ठेच्या बीड भूमिपुत्र' पुरस्काराने सन्मानित झालेले राजर्षी शाहू महाराज कौडगाव हुडा संस्थेचे अध्यक्ष तथा वसंतनगर तांडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डी. एस. राठोड यांचा सर्व बंजारा समाजाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात बंजारा समाजाचे श्रद्धेय धर्मगुरू बाबुसिंग महाराज, राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे, पुसदच्या नगराध्यक्षा मोहिनीताई इंद्रनील नाईक यांच्या शुभहस्ते श्री.डी.एस. राठोड साहेबांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद गटनेते मा.अजय मुंडे, वसंत राठोड,प्रेमदास पवार, बाळासाहेब (पप्पू) चव्हाण, सिरसाळ्याचे सरपंच शेख नशीब, प्रविण पवार, विशाल चव्हाण, आकाश राठोड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राठोड यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डी. एस. राठोड यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार, सामाजिक बांधिलकी आणि वसंतनगरच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. यावेळी बंजारा समाजातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गौरवपूर्ण सन्मानाबद्दल उपस्थितांनी श्री. डी. एस. राठोड साहेबांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कै. वसंतराव नाईक जयंती महोत्सवात बीड भूमिपुत्र' पुरस्काराने मिळाल्याबद्दल माझा जाहीर सत्कार होणे, हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा व अविस्मरणीय क्षण आहे. माझ्या शैक्षणिक, सामाजिक आणि ग्रामविकासाच्या कार्याची घेतलेली ही दखल मला अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारी आहे. हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून माझे कुटुंबीय, सहकारी, विद्यार्थी, ग्रामस्थ, हितचिंतक आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचा आहे. सकल बंजारा समाज, जयंती महोत्सव समिती तसेच उपस्थित धर्मगुरू बाबुसिंग महाराज,आ. धनंजय मुंडे, ना.पंकजाताई मुंडे, सौ.मोहिनीताई इंद्रनील नाईक व सर्व मान्यवरांनी दिलेल्या या सन्मानाबद्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. या पुरस्कारातून आणि सत्कारातून मिळालेली प्रेरणा कायम जपून समाजहित, शिक्षणाचा प्रसार आणि ग्रामीण विकासासाठी यापुढेही अधिक समर्पितपणे कार्य करत राहीन." असेही प्रतिक्रिया बीड भूमिपुत्र' पुरस्काराने प्राप्त तथा राजर्षी शाहू महाराज कौडगाव हुडा संस्थेचे अध्यक्ष तथा वसंतनगर तांडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डी. एस. राठोड यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment