परभणी (प्रतिनिधी) परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील गोदावरी हॉस्पिटल व स्कॉलर्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष तथा भूलतज्ज्ञ डॉ. मधुसूदन मगर यांचे अल्पशा आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. मृत्युसमयी ते ५४ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी डाॅ. स्मिता, डाॅ.नेहा, श्रेया ह्या दोन मुली, एक मुलगा आणि डाॅ.विजय व अजित मगर हे दोन भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान डाॅ. मगर त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि.७) सायंकाळी ५ वाजता परभणी येथील जिंतूर रस्त्यावरील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
No comments:
Post a Comment