Tuesday, January 13, 2026
बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विवेक जॉनसन साहेब लोकरत्न पुरस्काराने सन्मानित.
बीड (प्रतिनिधी).बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विवेक जॉनसन साहेब यांना लोक रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला यामध्ये प्रशासकीय अधिकारी सामाजिक कार्य करणारे व्यक्ती यांना सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष असे लाभलेले जिल्हाधिकारी विवेक जॉनसन साहेब यांना आज लोकशाही पत्रकार संघ सोमेश्वर महादेव हनुमान मंदिर फाउंडेशनच्या वतीने लोक रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यामुळे येथे उपस्थित असलेले पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोमेश्वर हनुमान मंदिर फाउंडेशनचे अध्यक्ष नवनाथ शिरोळे पाटील यांच्या हस्ते हा लोक रत्न पुरस्कार कलेक्टर साहेबांना देण्यात आला यावेळी येथे उपस्थित लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तसेच लोकशाही पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव सुनील दादा महा कुंडे तसेच लोकशाही पत्रकार संघाचे बीड जिल्हा संघटक संजय देवा कुलकर्णी कुक्कडगावकर सह आदी सह उपस्थित होते बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्हा अधिकारी म्हणून चार्ज घेतल्यापासून शासनाच्या धोरणाच्या कामाची म्हणजेच महाराष्ट्रा राज्याचे मा मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब उर्फ देवा भाऊ व मा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे मा उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मा श्री अजित दादा पवार साहेब यांच्या मंत्रिमंडळाने बीड जिल्ह्याच्या विकासाच्या धोरणात्मक निर्णय या बाबतीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यामध्ये एक स्पर्ट आणि यशस्वी ठरलेले जिल्हाधिकारी मा विवेक जॉनसन साहेब हे आहेत म्हणून याबद्दल समाधान यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा लोकशाही पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेब यांच्या प्रशासकीय कर्तव्याच्या बाबतीत समाधान व्यक्त केले .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment