पुणे (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) डिझेल दरवाढ आणि वाढलेल्या देखभाल खर्चाची भरपाई करण्यासाठी अलीकडे प्रवासी भाडेवाढ केली. मात्र, भाडेवाढीनंतरही अपेक्षित महसूलवाढ होत नसल्याचे वास्त समोर आले आहे. एकीकडे एसटी बसमध्य प्रवाशांची तुडुंब गर्दी असून, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सवलतींच्या योजनांमुळे प्रवासीसंख्येत वाढ झाली असतानाही कागदोपत्री उत्पन्न आणि खर्चाचा ताळेबंद जुळताना दिसत नाही. त्यामुळे एसटी प्रशासनाने नाराजी व्यक्त करून उत्पन्न लक्ष्यापेक्षा कमी असलेल्या आगारांना उत्पन्न वाढवण्याचे आदेश दिले आहेत. उत्पन्नात वाढ न झाल्यास संबंधित विभागप्रमुखांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
राज्यात सार्वजनिक वाहतुकीचे प्रमुख साधन हे एसटीच आहे. एसटी आंदोलन आणि करोनामध्ये प्रवासी संख्या खूपच कमी झाली होती. त्यानंतर सरकारने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकिटामध्ये सवलत सुरू केली. त्यानंतर एसटीची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली; पण अद्यापही एसटीला गर्दी दिसत असली, तरी उत्पन्नात म्हणावी अशी वाढ झालेली दिसत नाही.
काही विभाग वळगता सर्वत्र एसटी तोट्यातच असल्याचे दिसत आहे. काही आगारांना अपेक्षित उत्पन्नदेखील गाठता येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने प्रवाशांना चांगली सेवा देण्याच्या; तसेच उत्पन्नात वाढ होण्यासाठी आगारांना उत्पन्न वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उत्पन्नवाढीतील अडचणी
एसटीच्या उत्पन्नात वाढ न होण्याची अनेक कारणे पुढे येत आहेत. अनेक मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने प्रवाशांचा एसटीकडील ओढा कमी होत आहे. त्याचबरोबर जुन्या व खिळखिळ्या गाड्यांमुळे ब्रेकडाउनचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नियोजित फेऱ्या रद्द होण्याचे प्रकार घडत आहेत.काही ठिकाणी चालक-वाहक आणि स्थानिक नियोजन यांच्यातील समन्वयाचा अभावही महसूल घटण्यास कारणीभूत ठरत आहे. या पार्श्वभूमीवर महसूलवाढीसाठी प्रशासनाने कडक उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गळती रोखण्यासाठी अचानक तपासण्या, विनावाहक फेऱ्यांचे प्रमाण वाढवणे, मालवाहतुकीवर अधिक भर देणे; तसेच ज्या मार्गांवर खासगी वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे, त्या ठिकाणी एसटीच्या फेऱ्यांचे वेळापत्रक बदलून प्रवाशांना आकर्षित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यात सार्वजनिक वाहतुकीचे प्रमुख साधन हे एसटीच आहे. एसटी आंदोलन आणि करोनामध्ये प्रवासी संख्या खूपच कमी झाली होती. त्यानंतर सरकारने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकिटामध्ये सवलत सुरू केली. त्यानंतर एसटीची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली; पण अद्यापही एसटीला गर्दी दिसत असली, तरी उत्पन्नात म्हणावी अशी वाढ झालेली दिसत नाही.
काही विभाग वळगता सर्वत्र एसटी तोट्यातच असल्याचे दिसत आहे. काही आगारांना अपेक्षित उत्पन्नदेखील गाठता येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने प्रवाशांना चांगली सेवा देण्याच्या; तसेच उत्पन्नात वाढ होण्यासाठी आगारांना उत्पन्न वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment