मुंबई - राज्यात पूजा खेडकर प्रकरण गाजत असतानाच आता राज्यात २५० बोगस दिव्यांग अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थी संघटनेच्या सर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे. या २५० जणांची यादी एमपीएसी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लवकरच सादर केली जाणार आहे. यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
पुजा खेडकर प्रकरण गाजत असतानाच प्रशासकीय सेवेतील इतरही अनेक अधिकाऱ्यांनी बोगस अपंगत्व प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचा आरोप केला जात होता. यादरम्यान आता २५० बोगस दिंव्याग अधिकाऱ्यांची यादी काही विद्यार्थ्यांनी सर्व्हेतून तयार करण्यात केली आहे. ही यादी आता दिव्यांग मंत्रालय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन गैरप्रकार आढळल्यास कारवाई होणे अपेक्षित आहे.
पूजा खेडकर प्रकरण काय आहे?
गेल्या काही दिवसांपासून पूजा खेडकर प्रकरण राज्यासह देशभरात चांगलेच चर्चेत आहे. या पुजा खेडकर यांनी भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा (आयएएस) उत्तीर्ण होण्यासाठी बनवेगिरी केल्याचा आहे. याप्रकरणात यूपीएसीने त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला होता.
पूजा खेडकर यांनी बहुविकलांगता या प्रवर्गातून २०२२ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा दिली होती. यावेळी अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र देणे, कोट्यवधींची संपत्ती असताना आठ लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न दाखवून नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र सादर करणे. यासोबतच परीक्षा देण्याची मर्यादा संपलेली असताना नावात बदल करुन अनेकदा परीक्षा दिल्याचे आरोप पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आले.
दरम्यान हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पुजा खेडकर यांच्याविरोधात युपीएससीकडून गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी ३१ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण पुजा खेडकर यांनी मुदत उलटून गेली तरी काहीच उत्तर दिले नाही. इतकेच नाही तर पुणे पोलिसांनी देखील देखील पूजाला तीनदा समन्स पाठवून जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. पण याची देखील त्यांच्याकडून दखल घेण्यात आली नाही.
त्यानंतर पुजा खेडकर यांच्याकडून दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली होती त्याचा निकाल कोर्टानं राखून ठेवला होता. अखेर आज हा निकाल जाहीर करताना पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळं आता पुजा खेडकर यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे .
No comments:
Post a Comment