बीड (प्रतिनिधी) येथील तरुण पत्रकार तथा समाजसेवक पठाण अमर जान यांनी शहरातील अन्विता हॉटेल या ठिकाणी मनसे प्रमुख श्री राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे.
सविस्तर वृत्त असे की बीड येथील तरुण पत्रकार तथा समाजसेवक पठाण अमर जान यांनी काल हॉटेल अन्विता येथे मनसे मध्ये प्रवेश केला आहे मनसेचे अध्यक्ष श्री राज साहेब ठाकरे यांनी पठाण अमर जान यांना मनसेचा स्कार्फ घालून मनसे मध्ये प्रवेश दिला आहे मनसेचे पक्षनिरीक्षक आणि नाशिक महापालिकेतील मनसे नगरसेवक श्री सलीम मामा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मनसेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव बिडवे यांच्या शिफारशीने अमर जान पठाण यांचा मनसेत प्रवेश झाला आहे.
प्रस्थापित मुस्लिम नेते मुस्लिम समाजातील तरुणांना वेगळ्या मार्गाने घेऊन जात राजकारणापोटी मुस्लिम तरुणांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने व समाजाच्या शिक्षण,रोजगार व विकासाच्या मुद्द्यावर प्रस्थापित नेते आपले भूमिका मांडत नसल्याने आपण या गोष्टीला विरोध केल्याने मुस्लिम समाजाच्या तथाकथित प्रस्थापित नेत्यांना माझ्यासारख्या सुशिक्षित कार्यकर्त्याची अडचण होत असल्याने आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत असल्याचे पठाण अमर जान यांनी म्हटले आहे पठाण यांच्या प्रवेशाच्या वेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे पक्षनिरीक्षक नरेंद्र तांबोळी मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र नेमाणे यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment