Friday, August 9, 2024

परळीत श्रावणमास तपोनुष्ठानास भाविकांची मोठी गर्दी.हिंदू धर्मात श्रावण महिन्याचे अनन्यसाधारण महत्व - शि.भ.प.ऋषीकेश गौरशेटे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) हिंदू धर्मात श्रावण महीण्याचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. श्रावण महिन्यातील सोमवार हिंदू धर्मात पवित्र मानला जातो या दिवशी महादेवाची पूजा केली जाते तसेच श्रावण महीण्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा व व्रत करण्याची हिंदू व जैन धर्माची परंपरा आहे. श्रावण महिन्याला सणांचा महिना म्हटले जाते कारण श्रावण महिन्यातच सर्वात जास्त सण येतात या महीण्यात व्रत वैकल्याची रेलचेल असते असे प्रतिपादन कीर्तनकार शि.भ.प.ऋषीकेश गौरशेटे यांनी व्यक्त केले.
श्रावण मासाचे औचित्य साधून परळी वैजनाथ येथील पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेले श्री शनि मंदिर येथे  वसुंधरारत्न डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने वीरशैव लिंगायत समाज व श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळीच्या वतीने   ष.ब्र.108 श्री गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांंच्या श्रावणमास तपोनुष्ठान सुरू आहे. ष.ब्र.108 श्री गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांचे श्रावणमास तपोनुष्ठान,परमरहस्य पारायण व किर्तन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात कीर्तनकार शि.भ.प.ऋषीकेश गौरशेटे बोलत होते.
गुरूवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी कीर्तनकार शि.भ.प.ऋषीकेश गौरशेटे यांनी कीर्तन सेवा केली. आपल्या कीर्तनातून त्यांनी हिंदू धर्मात श्रावण महिन्याचे अनन्यसाधारण महत्व असल्याचे सांगून श्रावण महिन्यात नाग पंचमी, रक्षा बंधन, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला, मंगळागौर, बैल पोळा हे सण येतात. त्यानंतर येणारे गौरी गणपतीही याच महिन्यात खुणावत असतात,नाग पंचमी पासून दसरा दिवाळी पर्यंत सगळ्या हव्या हव्याशा सणांची सुरुवात याच महिन्यापासून होते. सणांच्या दिवशी गोडाधोडाचा बेत घराघरात असतो. श्रावणातील प्रत्येक दिवस सण होऊन जातो असे सांगितले.

13 दिवस चालणा-या तपोनुष्ठान सोहळ्यात श्रावणमास तपोनुष्ठान कालावधीत दररोज अन्नप्रसाद, अखंड शिवनाम सप्ताह,परमरहस्य पारायण सोहळा, कीर्तन, प्रवचन, वृक्षदान सोहळा, वृक्षारोपण, जलपुनर्भरण, आरोग्य तपासणी शिबीर, सांस्कृतिक व विविध समाज उपयोगी उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.यासोबतच श्रावणमास तपोनुष्ठान सोहळ्या दरम्यान दररोज प्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे तरी जनकल्याणासाठी आयोजित करण्यात आलेल्या या तपोनुष्ठान, परमरहस्य पारायण  सोहळ्याचा शहर व परिसरातील सर्व शिव भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन द्वादश पंचम् ज्योतीर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या परळी-वैजनाथ नगरीतील ष.ब्र.108 श्री गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या द्वादश श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे,कार्यअध्यक्ष चंद्रकांत उदगीरकर,शाहूराव ढोबळे,उपाध्यक्ष रमेशअप्पा सपाटे,मकरंद नरवणे,प्रा.महेश्वर निर्मळे,रघुनाथअप्पा भाग्यवंत,चंदूअप्पा हालगे,संतोष पंचाक्षरी,मनोज संकाये,सचिव सोमनाथअप्पा निलंगे,सहसचिव प्रकाश खोत,शिरीष सलगरे,रवीअप्पा मिसाळ,अशोक नावंदे,दत्ता गोपनपाळे,कोषाध्यक्ष सोमनाथ गोपनपाळे,पारायण प्रमुख दयानंद चौधरी,समन्वयक संजय खाकरे,प्रा.प्रवीण फुटके,सचिन काटकर,गणपत हरंगुळे,कैलास रिकीबे,सदानंद चौधरी,जगदीश मिटकर,गिरीष बेंबळगे,संतोष जुजगर,अतुल बेंडे प्रमुख पदाधिकारी वैजनाथ(बबन)शेटे,बबनअप्पा नाईक,गिरीष संकाये,रमेश चौधरी सर,गणेश स्वामी,संदीप चौधरी,उमाकांत पोपडे,दीपक कापसे,कपील चौधरी,अनिल मिसाळ,अनिल चौधरी,दयानंद स्वामी,योगेश स्वामी तसेच वीरशैव समाज व श्रावणमास तपोनुष्ठान समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment