Tuesday, August 13, 2024

ष.ब्र.108 श्री गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांचे श्रावणमास तपोनुष्ठान सप्ताह.भगवान शंकरांनी जगाचा उद्धार केला - शि.भ.प. अमोल लांडगे


*भाविक भक्तांची लक्षणीय उपस्थिती; शनिवारी होणार सांगता. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) श्रावणातच समुद्रमंथन झाले. ज्यामध्ये हलाहल विष बाहेर आले. जे भगवान शंकरांनी गळ्यात धारण करून जगाचा उद्धार केला, पण या विषाने त्यांच्या शरीरातील उष्णता वाढवली. विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवतांनी त्यांच्यावर जल अर्पण केले, त्यामुळे शिवलिंगाला अभिषेक करण्याची परंपरा असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार शि.भ.प. अमोल लांडगे बनवसकर यांनी  केले.
वीरशैव लिंगायत समाज आणि श्रावणमास तपोनुष्ठान समिती, परळी यांच्या वतीने ष.ब्र.108 श्री गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांचे श्रावणमास तपोनुष्ठान, अखंड शिवनाम सप्ताह कार्यक्रम सुरू असून याप्रसंगी शि.भ.प. अमोल लांडगे बनवसकर यांचे अखंड शिवनाम सप्ताह भव्य संपन्न झाले. या दिवशी, शि.भ.प. अमोल लांडगे बनवसकर यांनी भगवान शिव शंकराच्या महिमा समर्पकपणे व्यक्त करून उपस्थित भाविकांमध्ये आध्यात्मिक ऊर्जा निर्माण केली. कीर्तनाच्या दरम्यान विविध भजने सादर करण्यात आली, ज्यामुळे टाळ आणि मृदंगाच्या लहरी आवाजात मंदिर परिसर भक्तीने गुंजला.
याशिवाय, ष.ब्र.108 श्री गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या श्रावणमास तपोनुष्ठानाचा कार्यक्रम भक्तिभावाने सुरु आहे. या तपोनुष्ठानाच्या अंतर्गत पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी स्थित श्री शनि मंदिरात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. वीरशैव लिंगायत समाज आणि श्रावणमास तपोनुष्ठान समिती, परळी यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे.५ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या या दिव्य उपासनेचा समारोप १७ ऑगस्ट रोजी होणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे यांनी केले आणि या धार्मिक उत्सवाला नवीन ऊंची गाठण्यास मदत केली.
 मंगळवार 13 अॉगस्ट रोजी गुरूवर्यांचे पुजन व महाप्रसादाचे आयोजन श्री.विजयकुमार मेनकुदळे  व परीवाराच्यावतीने  करण्यात आले तसेच गुरूवर्यांची आरती माजी नगराध्यक्ष श्री.बाजीराव धर्माधिकारी,कल्पना साडी सेंटरचे प्रो.प्रा.ओमशेठ तापडीया,प्रा.तानाजी देशमुख सर व समाज बांधवांच्यावतीने करण्यात आली.
  श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे,कार्यअध्यक्ष चंद्रकांत उदगीरकर,शाहूराव ढोबळे,उपाध्यक्ष रमेशअप्पा सपाटे,मकरंद नरवणे,प्रा.महेश्वर निर्मळे,रघुनाथअप्पा भाग्यवंत,चंदूअप्पा हालगे,संतोष पंचाक्षरी,मनोज संकाये,सचिव सोमनाथअप्पा निलंगे,सहसचिव प्रकाश खोत,शिरीष सलगरे,रवीअप्पा मिसाळ,अशोक नावंदे,दत्ता गोपनपाळे,कोषाध्यक्ष सोमनाथ गोपनपाळे,पारायण प्रमुख दयानंद चौधरी,समन्वयक संजय खाकरे,प्रा.प्रवीण फुटके,सचिन काटकर,गणपत हरंगुळे,रमाकांत बुरांडे,कैलास रिकीबे,सदानंद चौधरी,जगदीश मिटकर,गिरीष बेंबळगे,संतोष जुजगर,अतुल बेंडे प्रमुख पदाधिकारी वैजनाथ(बबन)शेटे,बबनअप्पा नाईक,गिरीष संकाये,रमेश चौधरी सर,गणेश स्वामी,संदीप चौधरी,उमाकांत पोपडे,दीपक कापसे,कपील चौधरी,अनिल मिसाळ,बाळू चौधरी,नंदू शेटे,दयानंद स्वामी,आदेश हलकंचे,योगेश स्वामी  वीरशैव लिंगायत समाज व श्रावणमास तपोनुष्ठान समितीच्यावतीने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेण्यात येत आहेत.

No comments:

Post a Comment