बीड (प्रतिनिधी) - बीड नगरपरिषद मुख्याधिकारी नीता अंधारे यांची तात्काळ बदली करा, बीड शहर बचाव मंचाचा गंभीर इशारा दिला आहे या शिष्टमंडळा मध्ये बीड शहर बचाव मंचाचे प्रमुख पदाधिकारी नितीन जायभाये, सीपीआय जिल्हा सचिव भाऊराव प्रभाळे, बीड शहर काँग्रेस अध्यक्ष परवेजभाई कुरेशी, आम आदमी पार्टी जिल्हा अध्यक्ष अशोक येडे, समाजसेवक फैयाजभाई सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्य सचिव मीनाक्षीताई देवकते, अमजदभाई कुरेशी,अशोक वाघमारे, नानाभाऊ लव्हारे आदी उपस्थित होते.व बीड शहरातील नागरिकांच्या प्रमुख मूलभूत मागण्या बीड शहरातील अनेक भागांमध्ये मुळातच अजून एकदाही रस्तेच बनवले गेलेले नाहीत. अशा सर्व भागांमध्ये नागरिक होणाऱ्या चिखलामुळे त्रस्त आहेत. अशा सर्व भागांमध्ये पायी चालणे तसेच दुचाकी चालवणे अतिशय कठीण झाले आहे. तरी अशा सर्व भागांचा तात्काळ सर्वे करून रस्ते बनविणे गरजेचे आहे. तात्पुरती पर्यायी व्यवस्था म्हणून मुरूमकरण करणेही उपयोगाचे ठरू शकते.
बीड शहरातील सर्वच भागांमध्ये नाल्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी नाल्या तुमच्या आहेत. प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिकांच्या व लहान मुलांच्या आरोग्याला प्रचंड मोठा धोका निर्माण झाला आहे. तरी नाल्या सफाईची मोठी मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.
बीड शहरातील मोमीन पुरा व काही भागांमध्ये तुंबलेल्या नाल्यांच्या घाणीच्या साम्राज्यामुळे लोक प्रचंड त्रस्त झाले आहेत. लोकांचे दैनंदिन जीवन अतिशय हालाखीचे व नर्कमय बनत चालले आहे.
"याला जिम्मेदार कोण? बीड शहरामध्ये सर्वत्र रोग प्रतिबंधात्मक औषध फवारणीची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. तरी तात्काळ औषध फवारणीची व्यवस्था करण्यात यावी. शहरामध्ये याआधी बनवलेले सर्व रस्ते व नाल्या अतिशय निकृष्ट दर्जाचे व तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या आहेत. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रचंड मोठे साम्राज्य आहे. या रस्त्यांवर फिरताना नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. बीड शहरातील हजारो नागरिकांना पाठीचे व मणक्यांचे आजार होत आहेत. या रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले असल्यामुळे अनेक महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक हातपाय मोडून गंभीर अपघात ग्रस्त झाले आहेत.
जालना रोड ते स्मशानभूमी मोंढा रोड या भागाची अवस्था अतिशय वाईट आहे. या रस्त्यावरून पायी चालणे, वाहन या रस्त्यावरून पायी चालणे, वाहन चालवणे अशक्य झालेले आहे. बीड शहरातील प्रेस लाईन, पत्रकार रोडची ही वाईट दुरावस्था झालेली आहे . या रोडवर घाणीचे व कचऱ्याच्या ढिगांचे साम्राज्य आहे तरी तात्काळ सफाईची गरज आहे.
बीड शहरातील सर्वच भागांमध्ये कचऱ्याचे ढीग व डोंगर उभे राहिलेले आहेत. सर्वच भागांमध्ये सफाईची मोठी मोहीम राबवण्याची गरज आहे.पिण्याच्या पाण्याचे नियोजन ही विस्कळीत झालेले आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळत नाही. त्यामुळे कर्मचारीही आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.वर्षानुवर्षे वापरलेले पथदिवे नादुरुस्त अवस्थेत पोहोचले आहेत. अनेक ठिकाणी पथदिवे रिपेअर करूनही दुरुस्त होत नाहीत. या ठिकाणी नवीन पथदिवे लावण्याची गरज आहे व त्यासाठी आवश्यक विद्युत साहित्याची पूर्तता करण्याची गरज आहे. अशा पद्धतीने कारभार चालला तर पूर्ण शहर लवकरच अंधारात जाईल.बीड शहरात सर्वत्र कचरा जमा करणाऱ्या घंटा गाड्या बंद आहेत. बीड शहरात सर्वच भागांमध्ये कचऱ्याच्या मोठ्या कुंड्या किंवा पर्यायी व्यवस्था, गरजेची आहे . कचरा जमा करणाऱ्या घंटागाड्या बंद असताना कचरा कुठे फेकणार , कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा मोठा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.
सर्वच भागांमध्ये समस्या खूप आहेत. तरी नागरिकांनी आपआपल्या भागातील समस्या मांडत राहाव्यात. आपल्या समस्या संबंधित व्यवस्थेकडे पोहोचवत राहणे हाच आमचा मूळ उद्देश आहे. आपल्या समस्यांना तोंड फोडणे व समस्यां मांडण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करून देणे हाच आमचा मूळ उद्देश आहे .
आपण सर्वच बीड शहरातील मित्र बांधव महिला भगिनीं, इतर विभागांमधील शासकीय प्रशासकीय कामातील अडथळे , येणाऱ्या अडचणी याबद्दलही माहिती देऊ शकता. नगरपालिकेकडून जेवढे कर आकारले जातात तेवढ्या नागरिकांना सुविधा निर्माण झालेल्या नाहीत. मग हे कर कशासाठी आकारता?? या प्रश्नाचे उत्तर मिळणे गरजेचे आहे.नगरपालिकेत गुत्तेदारांची व प्रशासकीय अधिकाऱ्यांची मक्तेदारी तसेच मनमानी कधी बंद होणार?शहरांमध्ये महावितरण च्या कामांमध्येही मोठा गलथान कारभार दिसून येतो. शहरातील अनेक भागांमध्ये तासान तास लाईट जाणे , निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे सतत विद्युत पुरवठ्यामध्ये बिघाड होणे , हे प्रकार रोजच चालू आहेत.
अनेक भागांमध्ये नवीन पोल व डिप्यांची मागणी आहे. वर्षानुवर्ष मागणी असूनही त्याची पूर्तता केली जात नाही. महावितरण चे खाजगीकरण झाल्यापासून कामाचा दर्जा सुधारण्या ऐवजी दिवसेंदिवस कामाचा दर्जा व साहित्याचा दर्जा ढासळत चालला आहे. यावर शासनाचे व लोकांचे कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. कुठलीही यंत्रणा व्यवस्था वेळेवर पुरवली जात नाही. त्यामुळे लोकांची प्रचंड गैरसोय होत आहे. विज बिल आकारणी दरही गगनाला भिडलेले आहेत. यातह कुठलीही लोकांची दयामाया केली जात नाही. मग चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा पुरविणे गरजेचे आहे की नाही.
No comments:
Post a Comment