Tuesday, May 7, 2024

भूममध्ये मतदानाला गालबोट ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याची मतदान केंद्राबाहेर हत्या.


भूम (प्रतिनिधी) तिसऱ्या टप्प्यासाठी आज शांततेत मतदान सुरू असतानाच ठाकरे व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदान आणण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची घटना पाटसांगवी येथे घडली. या घटनेमध्ये तीन ते चार जण जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे.

भूम तालुक्यातील पाटसांगवी गावातील जिल्हा परिषदेच्या मतदान केंद्राच्या परिसरात हा वाद झाला. मतदान केंद्रावर मतदान आणण्यावरून हा वाद झाला आणि त्यानंतर त्याचं पर्यवसान मोठ्या भांडणात झालं. त्यातून शिंदे गटाने ठाकरे गटावर चाकू हल्ला केला. या चाकू हल्ल्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला.समाधान पाटील असं मृत तरुणाचं नाव आहे. तर ज्याने चाकू हल्ला केला त्या आरोपीचं नाव गौरव अप्पा नाईकनवरे असं आहे.

चाकू हल्ला करणारा हल्लेखोर फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. तर या हल्ल्यात इतर तीन जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.गेल्या काही दिवसांपासून दोन गटांमधील हा वाद चांगलाच धुमसत होता. आता मतदानाच्या दिवशी त्याचं निमित्त झालं आणि त्यातून ही हत्या झाली. तालुका रुग्णालयात समाधान पाटीलचा मृतदेह ठेवण्यात आला असून त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे भेट देणार आहेत

No comments:

Post a Comment