Tuesday, May 7, 2024

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, शेतमालाचे भाव, विकासया सारखे ज्वलंत प्रश्नांना बगल बीडकरांचा भ्रमनिरास.


अंबाजोगाई (प्रतिनिधी) शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, शेतमालाचे भाव, विकास यासारखे ज्वलंत प्रश्नांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बगल देत बीडकरांचा भ्रमनिरास केल्याचे चित्र पाहायला मिळालं.

अंबाजोगाई येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज झाली. यावेळी बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, इंडिया आघाडीचेहे लोक, मोदीनी सुरू केलेली किसान सन्मान निधी बंद करतील. गरिबांना मिळणारे मोफत राशन ते बंद करतील आम्ही देशातील 55 कोटी गरिबांना पाच लाखापर्यंतचा मोफत उपचार देत आहोत तो देखील बंद करतील अशी भीती व्यक्त केली.मात्र प्रधानमंत्री या जाहीर सभेतून विकासाच्या मुद्द्यावर बोलतील ही अपेक्षा फोल ठरली. शेतकरी आत्महत्या, शेतमालाचे पडलेले बाजार भाव, दुष्काळ यावर भाष्य करणं त्यांनी टाळलं. बीड रेल्वे चा प्रश्न ओझरता त्यांनी हाताळल्यामुळे या सभेतून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे.


No comments:

Post a Comment