Friday, May 3, 2024

अवैध धंद्यामूळे रस्ता अपघाताला आमंत्रण तिहेरी अपघातात एक ठार.


नेकनूर (प्रतिनिधी) परिसरात अवैध लाकूड व्यवसाय अपघाताला आमंत्रण देत आहे. येळंब घाट रस्त्यावर बोलेरो ट्रॅक्टर टेम्पो च्या तिहेरी अपघातात बुधवारी रात्री एकाचा जागीच मृत्यू झाला तर काहीजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. विनोद अशोक घोळवे असं मृत तरुणाचं नाव आहे. .

नेकनूर परिसरात अवैध वृक्षतोड करून लाकडाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असून येळंब घाट रस्त्यावर त्यांनी आपले बस्तान बसवलेले आहे. परिणामी मांजरसुंबा केज रस्त्यावर या अवैध धंद्यामूळे रस्ता अपघाताला आमंत्रण मिळत आहे. बुधवार दि 1 मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची बोलेरो जीप क्र. MH 26.V. 3402 ला जोरदार धडक बसली. या अपघातात बोलेरो जीप रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. त्यानंतर याच ट्रॅक्टर क्र. MH16 एफ 7904 ची पाठीमागून आयशर टेम्पो क्र. MH 24. AU.7885 धडक बसली. या अपघातात बोलेरो जीपमधील तालुक्यातील सारणी (सांगवी) येथील दसु उर्फ विनोद अशोक घोळवे वय 25 वर्ष या तरुणाचा जागीच मृत्यु झाला असून काही जण जखमी आहेत. जखमींना नेकनूर रुग्णालयातील उपचारानंतर पुढील उपचारासाठी बीडला हलविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment