Saturday, May 4, 2024

लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय मुलीला नेले पळवून, वैद्यकीय तपासणीनंतर कुटुंबा ला बसला धक्का.

 


आष्टी (प्रतिनिधी) लग्नाचे आमिष दाखवून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्रकार घडला. संबंधित मुलीची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर ती 6 महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पाेलिसांनी एकास अटक केली आहे. 

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार आष्टी तालुक्यातील एका 17 वर्षाच्या मुलीला तिच्या घरा शेजारी राहणा-या एकाने तिला पळवून नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. संबंधिताने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

पीडिता ही 6 महिन्यांची गर्भवती असल्याचा अहवाल आला. या धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान याप्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरुन एकास आष्टी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

No comments:

Post a Comment