परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाच्या दुर्गादेवीची आज रविवार दि.15 ऑक्टोबर रोजी श्री व सौ. निलेश पालीवाल यांच्या हस्ते विधीवत पूजा करून स्थापना करण्यात आली.
आज रविवारी भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक तथा शिवसेना मा.शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गादेवीची उत्साहपूर्ण वातावरणात स्थापना करण्यात आली. यावेळी दुर्गादेवीची शहराच्या प्रमुख मार्गावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. श्री व सौ.निलेश पालीवाल यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक तथा शिवसेना मा.शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांनी सांगितले की, नवरात्रीचे नऊ दिवस भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने विविध धार्मीक कार्यक्रम तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून दररोज सायंकाळी भजनी मंडळाचाही कार्यक्रम होणार आहे. याचसोबत विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.
यावेळी भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक भोजराज पालीवाल, वैद्यनाथ बँकेचे संचालक नारायणराव सातपुते, गजराज पालीवाल, महेश उर्फ पप्पू केंद्रे, बद्रीनारायणजी बाहेती, सतिश चौधरी, जरीचंद्र मस्के, अरूण गौड, गणेश सिरसाट, हरीष पालीवाल, विजय जाधव, जगन्नाथ आव्हाड, प्रथमेश वावदने, हनुमान कोळी, विशाल सुगरे, प्रितम जाधव यांच्यासह भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाचे पदाधिकारी, नागरिक व भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment