परळी वैजनाथ (प्रतिनिधी) सर्वांना सुख समृद्धी लाभू दे,कोणतेही आरोग्य संकट न येता सर्वांना निरोगी आयुष्य आई जगदंबेने द्यावे अशी प्रार्थना भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक तथा शिवसेना माजी शहर प्रमुख श्री भोजराज पालीवाल यांनी केली.
आज रविवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी भवानीनगर येथे दुर्गाष्टमीच्या निमित्ताने भवानीनगर दुर्गोत्सव मंडळात श्री भोजराज पालीवाल यांच्या हस्ते होम हवन करण्यात आले. यावेळी कुंडात आहुती देताना सर्वांना सुखी व कसलेही आरोग्य संकट यापुढे न येऊ आणि शेतकरी, व्यापारी व नागरिकांना आनंदाचे दिवस देवो अशी प्रार्थना श्री पालीवाल यांनी दुर्गादेवीला केली.
यावेळी नगजराज पालीवाल, मा.नगरसेवक अनिल अष्टेकर, महेश उर्फ पप्पू केंद्रे, सुधाकर मुंडे, अण्णा कुंभार, सुधाकर मुंडे, संदीप चौधरी, पिंपळे, नागरगोजे, अण्णासाहेब कुंभार, हरीश पालीवाल, गणेश सिरसाट, गोविंद चौरे, बालाजी गवळी, इंगळे टेलर, नितीन मुंडे, राम अंधारे, विशाल सुगरे, संतोष सावंत, जयचंद मस्के, विजय जाधव, पिंटू जाधव, प्रथमेश वडणे, राहुल उपाडे, रवि गौड, हनुमान कोळी, जगन्नाथ आवाड आदी उपस्थित
No comments:
Post a Comment