बीड शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या होत्या. पोलीस त्यांच्या मागावर असताना चोरी करणारी टोळी पोराच्या हाती लागली आहे. सद्दाम मुसा शेख (रा. बागवान गल्ली, केज), अमोल रामचंद्र कुरूंद (रा. वानगाव फाटा), ख्वाजामिया नवाब कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, केज), अशोक फुलचंद शिंदे व किरण अरुण पिसुरे (दोघे रा. जानेगाव, ता. केज) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दारू पिण्यासाठी चोरी
हे आरोपी दारू पिण्यासाठी मोटरसायकल चोरत होते. मोटारसायकल चोरून विक्री करणाऱ्या या टोळीने संपूर्ण जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून अनेक मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment