परळी वैजनाथ (प्रतिनिधी) थोर समाजसुधारक तत्वज्ञ सद्गुरू श्री वामनराव पै. जन्मशताब्दी वर्षा निमित्त रविवारी (ता.8) निवेदिता धावडे यांचे सुखी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर समाज प्रबोधन चा कार्यक्रम होणार आहे.
थोर समाजसुधारक तत्वज्ञ सद्गुरू श्री वामनराव पै. यांचे जन्मशताब्दी वर्ष निमित्त राज्यभर समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. रविवारी (ता.8) दुपारी 4:00 ते 5:30 पर्यंत परळी येथील श्री शनऐश्वर मंदिरात सुखी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर निवेदिता धावडे (मुंबई) यांचे भव्य समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिवन विद्या मिशन मुंबई च्या परळी शाखेच्या वतीने होणार्या समाज प्रबोधन च्या कार्यक्रमास साधकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment