ही दु्र्देवी घटना बीडच्या केज तालुक्यातील आडस गावात गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. कमल आश्रुबा इंगळे (वय ३५, रा. आडस, ता. केज) असे मयत महिलेचे नाव, तर लोचनाबाई आश्रुबा इंगळे (वय ७० वर्ष) असे जखमी महिलेचे नाव आहे. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्ती केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचा हा दिव्यांग असून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी पान टपरी चालवतो व तेथेच पेट्रोल विक्रीसाठी ठेवतो. दरम्यान, गुरूवारी सायंकाळी ७ च्या सुमारास घरात मुलगी व आई दोघे मिळून स्वयंपाक करताना अचानक घराने पेट घेतला.
पेटते घर पाहून मायलेकींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी अचानक स्फोट झाला. आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे कमल इंगळे या जळून जागीच ठार झाल्या तर आई भाजल्याने गंभीर जखमी झाली. हा स्फोट पेट्रोलचा झाल्याचा अंदाज आहे. पोलीस व धारुर अग्निशामक दल दाखल झाले आहे. या घटनेने आडस व परिसरात एकच खळबळ माजली आहे.
No comments:
Post a Comment