परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मीक कार्यक्रमांनी साजरी होणार असल्याची माहिती जय महाराष्ट्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा बीड जिल्हा युवा सेनेचे समन्वयक प्रा.अतुल दुबे यांनी दिली आहे.
आज बुधवार दि.1 मार्च रोजी जय महाराष्ट्र प्रतिष्ठाणच्या संपर्क कार्यालयात शिवसेना, युवा सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांची शिवजयंती निमित्त बैठक जय महाराष्ट्र प्रतिष्ठाणचे प्रमुख मार्गदर्शक तथा शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांच्या अध्यक्षतेखाली व जय महाराष्ट्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा बीड जिल्हा युवा सेनेचे समन्वयक प्रा.अतुल दुबे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
शुक्रवार दि.10 मार्च रोजी जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मोेंढा मार्केट येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मीक उपक्रमांनी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या बैठकीस जेष्ठ नेते सतिश जगताप, शिवसेना शहर संघटक संजय कुकडे, शिवसेना तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी, शिवाजीनगर युवा प्रमुख सुरेश परदेशी, छत्रपती शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाणे, उप शहर प्रमुख किशन बुंदेले, बबन ढेंबरे, अमित कचरे,सचिन लोढा, बजरंग औटी,मनिष जोशी,लक्ष्मण मुंडे,योगेश घेवारे,विजय पवार,माऊली मुंडे, नरेश मैड,योगेश जाधव, प्रकाश देवकर, जगन्नाथ तुपसौंदर, सोमनाथ गायकवाड, पंकज पांचाळ, संस्कार पालीमकर, आकाश जाधव, जगदीश पवार, विकास देवकर, सुधाकर बारसकार यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
No comments:
Post a Comment