नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला औरंगाबादची असून नोकरी मिळवण्यासाठी पालिका कार्यालयात आली होती. या महिलेचे आपल्या पती बरोबर जमत नसल्याने आणि तिच्या पतीने दोन्ही मुलांचा सांभाळ करण्यास नकार दिल्याने ही महिला आर्थिक विवंचनेत सापडली होती.
या महिलेने पूर्वी नर्स म्हणून रुग्णालयामध्ये काम देखील केले. मात्र आता नोकरी नसल्यामुळे तिच्या समोर मोठा आर्थिक पेच निर्माण झाला होता. बुधवारी नोकरीच्या शोधात ही महिला अंबरनाथ महापालिका कार्यालयात आली, मात्र तिला कोणत्याही अधिकाऱ्यांनी योग्य उत्तर न दिल्यामुळे ती त्रस्त झाली.
त्यानंतर ही महिला थेट महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर गेली. सुरूवातीला तिने आपल्या पायातील चप्पल आणि पर्स खाली फेकली. हा प्रकार सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी वरच्या मजल्यावर धाव घेतली. महिलेने उडी मारण्याच्या आधीच तिला पकडले. त्यानंतर त्या महिलेला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment