* वाळूने भरलेल्या हायवाची तहसीलदाराच्या गाडीला धडक देऊन केला जीवे मारण्याचा प्रयत्न…
गेवराई / बीड ;--प्रतिनिधी
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या गाडीला वाळूने भरलेल्या हायवाने पाठीमागून धडक दिल्याची घटना आज सायंकाळी 6:30 वा. सुमारास गढीजवळ घडली असून यात तहसीलदार प्रशांत जाधवर हे बालंबाल बचावले. दरम्यान तात्काळ घटनास्थळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी भेट दिली असून घटनास्थळावर ठाण मांडून आहेत.
गेवराई तालुक्यातील गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून आज सायंकाळी 6:30 च्या सुमारास अवैध वाळू वाहतुक करणारा हायवा आढळून आल्यानंतर त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या गाडीला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यात तहसीलदार प्रशांत जाधवर हे बालंबाल बचावले. दरम्यान सदरील हायवा पोलिसांनी ताब्यात घेतला असून चालक फरार झाला आहे. घटनास्थळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार,उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर,पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे दाखल झाले असून सदरील आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
No comments:
Post a Comment