बीड । ;- शहरातील पेठ बीड पोलिस ठाण्याच्या हदद्दीत आज (दि. 11 जून) सकाळपासून एकाच जागेवर झोपलेल्या एक अनओळखी इसमाला संध्याकाळी काही नागरिकांनी उठविण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो उढला नाही. जवळ जावून त्याला पाहिले असता त्याचा मृत्यू झाल्याचे समजल्याने तेथील नागरिक आणि पेठ बीड पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छदनासाठी जिल्हारुग्णालयात दाखल केला.
पेठ बीड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इदगा रोड सुभाष कॉलनी परीसरात एका नालिच्या बाजूला एक 40 ते 45 वर्षीय इसम सकाळपासून झोपलेला होता. संध्याकाळी त्या इसमाला तेथील नागरिकांनी उठवले मात्र तो उढला नाही. जवळ जावून उठविण्याचा प्रयत्न केला असता. तो मयत झाल्याने नागरिकांच्या निदर्शनास आल्याने पेठ बीड पोलिस आणि येथील नागरिकांनी मृतदेह शवविच्छदनासाठी जिल्हारुग्णालयात दाखल केला. शवविच्छदनानंतर त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे निष्पन्न होईल. पोलिस त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत.
No comments:
Post a Comment